मुंबई: मोबाईल, टॅबलेट, संगणकाच्या वाढत्या वापरामुळे डोळ्यांवर आता त्याचे आता गंभीर परिणाम दिसून येत आहेत. स्क्रिनच्या अतिवापरामुळे मायोपिया म्हणजेच दुरचे धुसर दिसणे यांसारखे आजार लोकांना जडत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार जगातील 30 टक्के लोक सध्या या दृष्टीदोषामुळे ग्रस्त आहेत. 2050 पर्यंत जगातील निम्म्याहून अधिक लोकांना चष्मा लागण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.
मोबाईलचा अतिरेकी वापर घातक
पाच वर्षांपेक्षा लहान मुलांकडून होणाऱ्या मोबाईलच्या अतिरेकी वापराबाबत नेत्ररोग तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. जगभरात आजच्या घडीला दृष्टीदोषामुळे 2.2 अब्ज लोक बाधित असून यातील अनेकजण योग्य उपचारांपासून वंचित आहेत. लहान वयात मुले मोबाईलच्या अधिक संपर्कात येणे त्यांच्या नेत्र आरोग्यासाठी घातक आहे.

डोळे कमजोर झाल्याची लक्षणे
डोळ्यांत जळजळ – सतत स्क्रिनकडे पाहिल्याने डोळ्यांतील ओलावा कमी होतो.डोळे कोरडे होतात. डोळ्यांवर गंभीर परिणाम होतो.
डोकेदुखी – डोळ्यांवर ताण आल्याने डोकेदुखी चांगलीच वाढते.
धुसर दिसणे – डोळे योग्य प्रकारे फोकस करू शकत नाहीत. परिणामी दूरचे धुसर दिसू लागते.
झोप न येणे – स्क्रिनमधील ब्लू लाईटचा परिणाम यामुळे मेलाटोनिन हार्मोन निर्मिती
कमी होते.
डोळ्यांत थकवा – पापणी कमी लवते, त्यामुळे डोळे कोरडे होवून थकवा जाणवतो.
निरोगी भविष्याच्या दृष्टीने डोळ्यांचे आरोग्य जपणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आवश्यकता नसताना स्क्रिनचा वापर टाळणे तसेच गाजरासारख्या डोळ्यांसाठी
आवश्यक असणाऱ्या भाज्यांचे सेवन महत्वाचे ठरते. डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी विशिष्ट जीवनसत्त्वे आणि पोषक घटक आवश्यक आहेत. काही डोळ्यांचे काही आजार विकसित होण्यापासून किंवा प्रगती करण्यापासून रोखण्यास मदत करतात. निरोगी, संतुलित आहार लोकांना आवश्यक पोषक तत्वे प्रदान करेल. आहारात संपूर्ण धान्य, शेंगा आणि भरपूर रंगीबेरंगी फळे आणि भाज्यांचा समावेश असावा.
व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा आणि डोळे कोरडे होऊ शकतात. शिवाय, संशोधन असे सूचित करते की व्हिटॅमिन ए समृद्ध आहारामुळे मोतीबिंदू आणि वय-संबंधित मॅक्युलर डीजेनरेशनचा धोका कमी होऊ शकतो. व्हिटॅमिन ए जास्त असलेल्या पदार्थांमध्ये गोड बटाटे, लाल मिरची, गाजर, भोपळा आणि स्क्वॅश यांचा समावेश होतो.











