आयपीएलमध्ये आज सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स सामना, दिल्ली प्ले ऑफ्स गाठणार?

आयपीएलचा 55 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद या संघांमध्ये खेळला जाणार आहे. दिल्लीला प्ले ऑफ्सची आशा कायम ठेवण्यासाठी आज विजय महत्वाचा आहे.

आयपीएल 2025 चा हंगाम आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. आज 55 वा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये खेळला जात आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. दिल्ली कॅपिटल्स आपली विजयाची मालिका कायम राखत प्ले ऑफ्सचं तिकिट पक्कं करणार का हे पाहणं महत्वाचं असेल, तर दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादच या आयपीएल सिझनमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे.

हैदराबाद की दिल्ली कोण जिंकेल?

आयपीएलच्या चालू सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्सने जोरदार कामगिरी केली आहे. मात्र अलिकडच्या काही सामन्यांमध्ये दिल्लीची लय गेली. दिल्लीने आपले सातत्य राखणे आवश्यक आहे. या हंगामात आजवर खेळलेल्या 10 सामन्यांपैकी 6 सामन्यांमध्ये संघाने विजय संपादीत केला आहे. संघ 12 गुणांसह गुणतालिकेत सध्या चौथ्या स्थानावर आहे. तसेच नेट रन रेट 0.362 असल्याने याचा फायदा संघाला आगामी काळात होऊ शकतो.

सनरायजर्स हैदराबादसाठी हा सिझन तितकासा चांगला राहिला नाही. संघाला मागील सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. कॅप्टन पॅट कमिन्स संघाचे पुनरागमन घडवून आणण्यात अपयशी ठरला आहे. आयपीएलच्या या चालू हंगामात आजवर 10 सामने खेळले असून पैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे, 6 गुण असून संघ गुणतालिकेत सध्या 9 व्या स्थानावर आहे. नेट रन रेट वजा असल्याने संघाची प्ले ऑफ्सची दारे आधीच बंद झाली आहेत.

परंतु इतिहास पाहिले असता असे दिसते की दोन्ही संघातील शेवटच्या 24 सामन्यांतील हैदराबादने 13 वेळा तर दिल्लीने 11 वेळा विजय मिळवला आहे. यात सनरायजर्स हैदराबाद संघाचे पारडे जड वाटत असले तरी आजच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा विजय होण्याचा अंदाज आहे.

दोन्ही संघांचे प्लेयिंग इलेव्हन

सनरायजर्स हैदराबाद

अभिषेक शर्मा, ईशान किशन, नीतीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, कामिंडु मेंडिस, पैट कमिंस (कॅप्टन), हर्षल पटेल, जयदेव उनादकट, राहुल चाहर, मोहम्मद शमी

दिल्ली कॅपिटल्स

जेक फ्रेजर-मैकगर्क, फाफ डुप्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल, अक्षर पटेल (कॅप्टन), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मुकेश कुमार, टी नटराजन, मोहित शर्मा


About Author

Rohit Shinde

Other Latest News