12 वी नंतर या क्षेत्रात करा एंट्री, यश आणि पैसा दोन्ही मिळेल, जाणून घ्या पर्याय

नुकताच 12 वी च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोण पुढे कोणत्या शाखेत शिकणार, कोणतं करिअर करणार याची निवड सध्या विद्यार्थी करत असतात. अशावेळी विविध पर्याय समोर आहेत.

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 91.88 टक्के आहे. आता पास झालेले अथवा मेरीटमध्ये आलेले विद्यार्थी आणि पालक पुढील दिशा ठरवत आहेत. कोणत्या शाखेत पुढे शिकावं, कोणता कोर्स करावा अथवा कोणता जॉब करावा असे मंथन सध्या सुरू आहे. त्यामुळे यश आणि पैसा एकत्रित मिळावा अश्या करिअरचा साधारण शोध घेतला जातो…12 वी नंतर करिअरचे जे उत्तम पर्याय आहेत. त्याबद्दल जाणून घेऊ…

इयत्ता बारावी (HSC) नंतर करिअरसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आपण कोणत्या शाखेत (सायन्स, कॉमर्स, आर्ट्स) शिक्षण घेतलं आहे, त्यावर आधारित करिअरचे मार्ग बदलू शकतात.

कोणत्या शाखेत काय संधी?

विज्ञान शाखा:

सायन्समधून बारावी उत्तीर्ण झाल्यास तुम्ही इंजिनिअरिंग, वैद्यकीय शिक्षण जसे की (MBBS, BDS, BAMS, BHMS), फार्मसी, नर्सिंग, B.Sc., Agriculture, Biotechnology, IT/Computer Science यासारख्या कोर्सेससाठी प्रवेश घेऊ शकता. याशिवाय NDA (National Defence Academy), Navy, Air Force सारख्या क्षेत्रांतही संधी आहेत.

कॉमर्स शाखा:

कॉमर्सचे विद्यार्थी B.Com, BBA, CA (Chartered Accountant), CS (Company Secretary), CMA (Cost & Management Accounting), Hotel Management, Banking, Law (BBA LLB / B.Com LLB) यांसारख्या कोर्सेस करू शकतात. व्यवसाय सुरू करण्याचीही संधी असते.

आर्ट्स शाखा:

आर्ट्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठी BA, Mass Communication, Journalism, Fashion Designing, Interior Designing, Law, Hotel Management, Travel & Tourism, Psychology, Social Work, Civil Services (UPSC/MPSC) हे चांगले पर्याय आहेत.

व्होकेशनल आणि स्कील-बेस्ड कोर्सेस:
व्यावसायिक कोर्सेस जसे की ITI, Diploma Courses, Animation, Graphic Designing, Photography, Event Management, Digital Marketing यांचाही विचार करता येतो. हे कोर्सेस कमी कालावधीत पूर्ण होतात आणि नोकरीची संधी मिळते.

सरकारी परीक्षा:
बारावी नंतर तुम्ही SSC, Railway, Police Bharti, Banking Clerical यांसारख्या सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षांची तयारी करू शकता.

निवड करताना घ्या काळजी

तुमच्या आवडी, क्षमतांचा विचार करून योग्य करिअर निवडणे महत्त्वाचे आहे. योग्य मार्गदर्शन घेतल्यास यश नक्की मिळते. करिअरचा निर्णय घेत असताना विद्यार्थ्यांनी पालकांना विश्वासात घ्यावे, तसे आपले मार्गदर्शक, शिक्षक यांचा सल्ला देखील मोलाचा ठरतोय करिअर निवडताना घाई करू नये, अन्यथा पश्चात्तापाची वेळ येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी.


About Author

Rohit Shinde

Other Latest News