CBSC Result 2025 class 12th out : सीबीएसई बोर्डाने १२वी चा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी आपला निकाल cbse.gov.in, cbseresults.nic.in, results.cbse.nic.in आणि results.gov.in अधिकृत वेबसाइट्सवर जाऊन पाहू शकतात.
याव्यतिरिक्त, डिजिलॉकर अॅप, उमंग अॅप आणि एसएमएस सेवेद्वारे देखील निकाल पाहता येऊ शकतो. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर, शाळेचा क्रमांक, अॅडमिट कार्ड आयडी आणि जन्मतारीख टाकावी लागेल.

किती विद्यार्थी उत्तीर्ण?
यावर्षी बारावीच्या परीक्षेत १६,९२,७९४ विद्यार्थी बसले होते त्यापैकी १४,९६,३०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा १८ मार्च रोजी झाल्या होत्या, तर बारावीची शेवटची परीक्षा ४ एप्रिल रोजी झाली होती.
यंदाही मुलींनी मारली बाजी
सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या निकालात यावर्षी मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का हा ९१.६४% आहे, तर मुलांचा ८५.७०% आहे आणि ट्रान्सजेंडरचा उत्तीर्णतेचा टक्का १००% आहे. यंदाच्या वर्षीचा (२०२५) निकाल २०२४ पेक्षा चांगला लागला आहे. मुलींचा उत्तीर्ण होण्याचा टक्का मुलांपेक्षा ५.९४% जास्त आहे.
डिजीलॉकरवर बारावीचा निकाल कसा पाहणार?
- ‘डिजिलॉकर’ अॅप डाउनलोड करा
- digiLocker.gov.in वर जा.
- तुमचा रोल नंबर, वर्ग, शाळेचा कोड आणि ६ अंकी पिन (शाळेने दिलेल्या माहितीनुसार) टाका.
- त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावर OTP येईल तो भरा.
- तुम्हाला तुमची मार्कशीट स्क्रीनवर दिसेल.
‘उमंग‘ अॅपवर बारावीचा निकाल कसा पाहणार?
- ‘उमंग’ अॅप डाउनलोड करा.
- अॅप उघडा आणि शिक्षण विभागात जा आणि ‘CBSE’ निवडा.
- तुमचा निकाल डाउनलोड करण्यासाठी आवश्यक माहिती भरा.
- काही क्षणातच तुम्हाला निकाल दिसेल.











