Manoj Jarange Maratha Morcha : तोडगा निघाला, अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेलं आंदोलन आज (मंगळवार, २ सप्टेंबर) अखेर संपलं आहे.

Maratha reservation :  मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात सुरू असलेलं आंदोलन आज (मंगळवार, २ सप्टेंबर) अखेर संपलं आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील यांनी यासंदर्भातील घोषणा केली. (Manoj Jarange Maratha Morcha)

याबाबत मनोज जरांगे पाटील म्हणाले, महाराष्ट्र सरकारने जर मराठा आरक्षणाच्या मागणीचा सरकारी आदेश (जीआर) केला तर आज रात्री ९ वाजता सर्व मराठा बांधव आपआपल्या गावी परततील. याशिवाय महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण आंदोलकांविरोधात दाखल केलेली प्रकरणं रद्द करणार असल्याचं वचन दिलं आहे.

मनोज जरांगे आणि सरकारमध्ये सकारात्मक चर्चा

मनोज जरांगे आणि सरकारमध्ये आज सकारात्मक चर्चा झाली असून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत जरांगे पाटील यांची सकारात्मक बैठक झाली. सरकारच्या मराठा समितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचं सांगितलं आहे. त्यानुसार, गावातील, नात्यातील, कुळाकील लोकांची चौकशी केल्यानंतर त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल. याशिवाय सातारा गॅझेटच्या मागणीवरही लवकरच निर्णय घेणार असल्याचं उपसमितीने सांगितलं. विशेष म्हणजे मराठा आणि कुणबी एकच असल्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली होती, त्यावर उपसमितीने या प्रक्रियेसाठी काही महिन्यांचा वेळ मागितला आहे.

या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे…

१ हैदराबाद गॅझेटियर – हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला उपसमितीकडून मान्यता

२ आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या – आतापर्यंत मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी सरकार न्यायालयात जाणार

३ मराठा – कुणबी एकच – मराठा आणि कुणबी एकच असून या मागणीचा जीआर काढण्यासाठी सरकारला २ महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाने काय म्हटले?

उच्च न्यायालयाने म्हटलं की, आंदोलनात अनेक नियमांचे पालन झाले नाही. लोकांनी त्यांची वाहने कुठेही पार्क केली ज्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आणि मुंबईतील लोकांना त्याचा सामना करावा लागला. न्यायालयानेही राज्य सरकारलाही फैरीवर घेतले आणि परिस्थिती इतकी स्तरावर का येऊ दिली असा सवाल केला. मराठा आंदोलकांनी काल रात्री आझाद मैदानावर आंदोलन सुरू ठेवण्यासाठी पोलिसांकडून परवानगी वाढवण्याची मागणी केली होती, जी आज सकाळी मुंबई पोलिसांनी फेटाळून लावली. यानंतर, आंदोलकांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले, जिथे त्यांच्या वतीने वकील सतीश मानशिंदे उपस्थित होते.

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News