अफगाणिस्थानात पुन्हा भूकंप, 1400 जणं मृत्युमुखी, तालिबानच्या मदतीसाठी भारताचा पुढाकार

अफगाणिस्ताननं केलेल्या मदतीच्या आवाहनानंतर भारतासह चीन आणि इंग्लंड यासारख्या देशांनीही मदत पाठवली आहे. इंग्लंडनं 10 कोटींच्या आपतकालीन निधीची घोषणा केली आहे.

काबूल- अफगाणिस्थानावर पुन्हा एकदा भूकंपामुळे नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. मंगळवारी नैऋत्येच्या भागात 5.5 रिश्टर स्केलचा भूकंप नोंदवण्यात आला. यापूर्वी जलालाबादमध्ये रविवारी 6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला होता.

आतापर्यंत भूकंपामुळे मृत्यमुखी पडलेल्यांची संख्या आता 1400 पेक्षा जास्त असल्याचं सांगण्यात येतंय. तर जखमींची संख्या सुमारे 3600 पेक्षा जास्त आहे.

रविवारी ज्यावेळी भूकंप झाला त्यावेळी सगळे जणं झोपलेले होते. त्यामुळे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जााऊन अनेकांचा मृत्यू झालेला आहे.

तालीबान सरकारकडून जगभरात याचना

या भूकंपाच्या घटनेनंतर आधीच तोट्यात असलेली अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था अधिक कोलमडम्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सत्तारुढ तालीबान सरकारनं जगासमोर मदतीचा हात पुढं केला आहे. या भूकंपानंतर भारतानं तातडीनं 1000 टेन्ट अफगाणिस्तानकडे रवाना केले आहेत. 15 लाख टन खाद्यपदार्थही पाठवण्यात आले आहेत.

ब्रिटननंही पाठवली मदत

अफगाणिस्ताननं केलेल्या मदतीच्या आवाहनानंतर भारतासह चीन आणि इंग्लंड यासारख्या देशांनीही मदत पाठवली आहे. इंग्लंडनं 10 कोटींच्या आपतकालीन निधीची घोषणा केली आहे. तर अफगाणिस्थानच्या गरजेनुसार आणि चीनच्या क्षमतेनुसार मदत करण्यात येईल असं चीननं म्हटलंय.

अनेक गावं उद्ध्वस्त झाली

हा भूकंप जलालाबाद शहरापासून 17 मील दू अंतरावर झालाय. नांगरहार प्रांतात यामुळे अमेक गावं ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. हा परिसर राजधानी काबूलपासून 150 किमी अंतरावर आहे. हा संपूर्ण परिसर हा डोंगराळ असल्यानं संपर्काची अडचणं अभी राहताना दिसतायेत.


About Author

Smita Gangurde

Other Latest News