International News : भारत आणि चीनशी अशा भाषेत बोलू शकत नाही, पुतीन यांचा ट्रम्प यांना इशारा

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिलाय.

Russian President Vladimir Putin’s warn to US President Donald Trump : बीजिंग – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिलाय. भारत आणि चीनला टेरिफच्या नावाखाली धमकावणं बंद करा, असं पुतीन म्हणाले आहेत. भारत आणि चीन हे दोन्ही देश धमक्यांना घाबरणार नाहीत, असं पुतीन यांनी स्पष्ट केलंय.

चीनच्या व्हिक्टरी परेडमध्ये सामील झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना पुतीन यांनी ट्रम्प या दोन्ही देशांबाबत अशा प्रकारची विधानं करु शकत नाहीत, असं म्हटलंय. भारत आणि चीन या दोन्ही देशांचा इतिहास हा हल्ल्यांनी भरलेला आहे. या दोन्ही देशाच्या नेत्यांपैकी एकानंही कमकुवतपणा दाखवला तर त्यांचं राजकीय करिअर संपेल, असंही पुतीन म्हणालेत.

ट्रम्प यांना पुतीन यांचा इशारा

भारत, चीन आणि रशिया हे तिन्ही देश एकमेकांचे सहकारी आहेत. या देशांत १.५ अब्ज नागरिक राहतात आणि या तिन्ही देशांची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे. या देशांना शिक्षा देण्याबाबत कुणी बोलूही शकत नाही, असं सांगत पुतीन यांनी ट्रम्प यांना इशारा दिलाय.

भारत रशियाकडून कच्चं तेल खरेदी करतो, याला अमेरिकेचा विरोध आहे. रशियाकडून तेल खरेदी करुन युक्रेनविरुद्धच्या युद्धात भारत रशियाची मदत करत असल्याचं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. टेरिफ लागू केल्यानं युद्ध थांबेल असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. टेरिफ धोरणामुळे अमेरिकेला ताकद मिळते असं सांगत या टेरिफमुळे सात युद्धं थांबवल्याचा दावाही ट्रम्प करतायेत.

ट्रम्प हे पारंपरिक मानसिकता असलेले – पुतीन

अमेरिकेची ही भूमिका ही रुढीवादी असल्याची टीका पुतीन यांनी केली आहे. आपल्या सहकारी राष्ट्रांसोबत याप्रकारे भाषा योग्य नाही, असा सल्लाही पुतीन यांनी ट्रम्प यांना दिला आहे. भविष्यात तणाव कमी होईल आणि राजकीय चर्चा पुन्हा सुरु होईल अशी आशाही पुतीन यांनी व्यक्त केली आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News