Rupali Ganguly Stuck In Traffic : मुंबई ट्रॅफिकने ‘अनुपमा’ची केली कोंडी! रुपाली गांगुलीचा संताप; BMC वर साधला निशाणा

रुपालीसारख्या सेलेब्रिटींना जर अशा अडचणी येत असतील, तर मग रोज लोकल, बस, ऑटोने कामावर जाणाऱ्या सामान्य मुंबईकरांचं काय?

‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुली हिने मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेवर आणि बीएमसीच्या नियोजनावर कठोर शब्दांत टीका करत ट्विटर/X वर एक संतप्त पोस्ट केली आहे. ती जवळपास 14 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी दीड-दोन तास ट्रॅफिकमध्ये अडकली होती, (Rupali Ganguly Stuck In Traffic)आणि या अनुभवाने ती प्रचंड संतप्त झाली.

फक्त 14 किमी, पण 2 तास लागले

रुपालीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती फिल्म सिटीबाहेर आपल्या ऑटोमध्ये बसलेली दिसते आणि सांगते की ती तासाभरापासून तिथेच अडकून आहे. (Rupali Ganguly Stuck In Traffic) “रोज सकाळी 1 तासात सेटवर पोहोचत होते, पण आता अडीच तास लागतात. बीएमसीच्या खराब प्लॅनिंगमुळे वेळेचं भान राहत नाही!” असे ती म्हणाली. रुपाली गांगुलीच्या मते, फिल्म सिटीबाहेर सुरू असलेलं मेट्रोचं काम चुकीच्या वेळेस केलं जातंय. “रस्त्यावर सकाळी 10 वाजता मोठ्या कंटेनरची ने-आण? अर्धा रस्ता बंद, आणि बाकी ट्रॅफिक ठप्प! हे सामान रात्री 3-4 वाजता आणायला हवं होतं. या वेळेस लोक ऑफिसला, शूटिंगला जातात, हेच समजत नाही का?” असा ती संतप्त प्रश्न विचारते. 

https://www.instagram.com/reel/DOaVfTIjI0_/?igsh=MWE2Y2g2bm5tNW9udg==

सामान्य मुंबईकरांचं काय?

रुपालीसारख्या सेलेब्रिटींना जर अशा अडचणी येत असतील, तर मग रोज लोकल, बस, ऑटोने कामावर जाणाऱ्या सामान्य मुंबईकरांचं काय? मुंबईत मेट्रो, रस्ते कामं, ड्रेनेज सुधारणा यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत होतेय. अंधेरी, गोरेगाव, दहिसर आणि कुर्ला परिसर हे नेहमीच ट्रॅफिक हॉटस्पॉट ठरले आहेत.

BMC आणि MMRDAवर सवाल – Rupali Ganguly Stuck In Traffic

रुपालीने बीएमसीच्या कार्यप्रणालीवर थेट सवाल उपस्थित केले आहेत. परंतु मेट्रो प्रकल्पाची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (MMRDA) देखील आहे. त्यामुळे नेमकी जबाबदारी कुणाची? बीएमसी की MMRDA? हा प्रश्न नागरिक आणि सेलेब्रिटी दोघांच्याही मनात आहे.

रुपाली गांगुलीचा सल्ला

रुपालीने शेवटी प्रशासनाला सल्ला दिला – “महत्वाच्या रस्त्यांवर अशी कामं रात्री 3-4 वाजता व्हायला हवीत, जेव्हा ट्रॅफिक कमी असतं. सकाळी किंवा ऑफिस टाइमला काम केल्यामुळे लाखो लोक अडकतात. मुंबईकरांमध्ये संयम आहे, पण तो अमर्याद नाही.

रुपाली गांगुलीसारख्या सेलिब्रिटीचा आवाज सामान्य नागरिकांचा आवाज बळकट करू शकतो. मुंबईची वाहतूक समस्या नुसती सोशल मीडियावर मांडून संपणार नाही, तर त्यावर शाश्वत उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. बीएमसी आणि MMRDAने या संतप्त प्रतिक्रिया गंभीरतेने घेणं गरजेचं आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News