Urvashi Rautela Ed Summons : उर्वशी रौतेलाला ED चे समन्स; बेटिंग प्रकरणी अडचणी वाढणार??

चौकशीसाठी उर्वशी रौतेला ला १६ सप्टेंबर रोजी ईडीच्या दिल्ली मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत

बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला ईडीने समन्स बजावला आहे…. बेकायदेशीर बेटिंग अॅप प्रकरणात उर्वशीला ईडीचे समन्स (Urvashi Rautela Ed Summons) बजावण्यात आलेले आहेत. चौकशीसाठी उर्वशी रौतेला ला १६ सप्टेंबर रोजी ईडीच्या दिल्ली मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उर्वशी रौतेला सोबत माजी टीएमसी खासदार मिमी चक्रवर्ती हिला सुद्धा बेकायदेशीर बेटिंग अॅप प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? Urvashi Rautela Ed Summons

अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने ‘वनएक्सबेट’ नावाच्या बेटिंग अॅपची जाहिरात केली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे. त्याच प्रकरणी उर्वशीला चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. खरं तर, ईडीच्या तपासात असे आढळून आले आहे की अनेक ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म भारतात बेकायदेशीरपणे त्यांचा व्यवसाय पसरवत आहेत. यापैकी एक ‘वनएक्सबेट’ आहे. याच वनएक्सबेटच्या जाहिराती आणि प्रमोशन मध्ये अनेक भारतीय सेलिब्रिटीचा सहभाग पाहायला मिळाला.  या अ‍ॅप्सच्या प्रचार करण्यात भारतीय सेलिब्रिटींनी किती प्रमाणात भूमिका बजावली हे तपास यंत्रणा जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. (Urvashi Rautela Ed Summons)

यापूर्वी शिखर धवनची चौकशी –

मागील आठवड्यात, ईडीने बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मविरुद्ध मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनची चौकशी केली होती. बनावट जाहिरातींसाठी आणि या प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांकडून पैसे गोळा करण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्मचा वापर केल्याचा आरोप आहे. शिखर धवनपूर्वी सुरेश रैना ची ईडीने कसून चौकशी केली होती. असे सांगितले जात आहे की अनेक लोकांनी वनएक्सबेट मध्ये पैसे गुंतवले आहेत आणि त्यांना खूप आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. सेलिब्रिटींचे बेटिंग अॅप्सशी असलेले संबंध, जाहिरातींचे शुल्क आणि त्यांच्यातील संवाद याबाबत कसून चौकशी करत आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News