भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी यंदा दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या दशकेभराच्या अभूतपूर्व कारकिर्दीला हा मानाचा मुजरा ठरला आहे.यावर्षीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा (Natioanl Film Awards 2025) विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट कलाकृतींचा साक्षीदार ठरला. ‘12th फेल’ या प्रेरणादायी चित्रपटाने सर्वोत्तम चित्रपटाचा किताब पटकावला. तर, सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरल स्टोरी’ ला सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले.
*महत्त्वाचे विजेते पुढीलप्रमाणे* (National Film Awards 2025)
* सर्वोत्तम लोकप्रिय चित्रपट: रॉकी और रानी की प्रेम कहानी
* सर्वोत्तम तेलुगू चित्रपट: भगवंत केसरी
* सर्वोत्तम गुजराती चित्रपट: वश
* सर्वोत्तम तमिळ चित्रपट: पार्किंग
* सर्वोत्तम कन्नड चित्रपट: द रे ऑफ होप (National Film Awards 2025)

संगीत क्षेत्रात
* सर्वोत्तम गायिका: शिल्पा राव – ‘छलिया’ (जवान)
* सर्वोत्तम गायक: प्रेमिस्थुन्ना – (बेबी, तेलुगू)
* सर्वोत्तम गीत: बलगम – ‘द ग्रुप’ (तेलुगू)
*तांत्रिक विभाग*
* सर्वोत्तम छायाचित्रण: द केरल स्टोरी
* सर्वोत्तम कोरिओग्राफी: ‘ढिंढोरा बाजे रे’ – रॉकी और रानी की प्रेम कहानी
* सर्वोत्तम मेकअप व कॉस्ट्यूम: सॅम बहादुर
* सर्वोत्तम साउंड डिझाईन: अॅनिमल
* स्पेशल मेंशन (री-रिकॉर्डिंग मिक्सर): अॅनिमल – एम. आर. राधाकृष्णन
* सर्वोत्तम अॅक्शन: हनु-मैन (तेलुगू)
*नॉन-फिचर विभाग*
* सर्वोत्तम चित्रपट समीक्षक: उत्पल दत्ता (आसाम)
* सर्वोत्तम माहितीपट: गॉड, वल्चर अँड ह्यूमन
* सर्वोत्तम पटकथा: ‘सनफ्लॉवर वर द फर्स्ट वन टू नो’ (कन्नड)
* सर्वोत्तम चित्रपट:
* ‘नेकल: क्रॉनिकल ऑफ द पेडी मॅन’ (मलयाळम)
* ‘द सी अँड सेवन विलेजेस’ (उडिया)
* सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक (प्रथम चित्रपटासाठी): हिंदी
* सर्वोत्तम एडिटिंग: मूवी फोकस (इंग्रजी)
या पुरस्कारांनी यंदाच्या चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कार्याला योग्य तो सन्मान दिला आहे. मोहनलाल यांना मिळालेला दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय सिनेमाच्या तेजाला अधोरेखित करणारा ऐतिहासिक क्षण ठरतोय.











