पूरग्रस्तांसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; आमदार खासदार देणार इतके पैसे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी खंबीरपणे उभा आहे. पक्षाच्या वतीने लवकरच आणखी काही मदत योजनांची घोषणा करण्यात येणार असल्याचेही सुनील तटकरे यांनी सांगितले

राज्यात यंदाच्या धुव्वाधार पावसामुळे होत्याचे नव्हते झाले आहे…. मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे उभं पीक पाण्याखाली गेला आहे… बळीराजा अक्षरशः आर्थिक मदतीसाठी टाहो पडतोय… सरकारने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक पॅकेजची घोषणा केली असली तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

संकटाच्या काळात जनतेसोबत राहणे गरजेचे –

संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचे असल्याचे तटकरे यांनी सांगितले. तसेच, सर्व राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनी आपापल्या भागात मदतीचे काम सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी खंबीरपणे उभा आहे. पक्षाच्या वतीने लवकरच आणखी काही मदत योजनांची घोषणा करण्यात येणार असल्याचेही सुनील तटकरे यांनी सांगितले

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी पूर्वनियोजित सर्व कार्यक्रम रद्द करत थेट पूरग्रस्त भागात भेट दिली. आज ते सोलापूर, धाराशीव आणि बीड या जिल्ह्यांना स्वतः भेट देत असून, स्थानिक मंत्र्यांसोबत पूरपरिस्थितीची पाहणी करत आहेत.

शिंदेंच्या पक्षाकडूनही मदत जाहीर –

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदार-खासदार सुद्धा आपला एका महिन्याचा पगार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे. सत्तेतील दोन्ही पक्षांनी पूरग्रस्तांसाठी निधी जाहीर केल्याने शेतकऱ्यांना थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News