…जर सत्ताधारी आमदारांना निधी मिळत नाही, तर सदा सरवणकरांच्या 20 कोटीचे रहस्य त्यांनाच विचारा

प्रत्येक वर्षी दसरा मेळाव्यात पाऊस असतो. तरीही दसरा मेळावा पार पडतो. त्यामुळे सध्या पाऊस कमी आहे. मैदानीही थोडफार सुकले आहे. त्यामुळे आमची तांत्रिक टीम आहे, त्यांच्यासोबत बोलणे सुरू आहे. पण काही झाले तरी दसरा मेळावा हा थाटामाटात होणारच.

mumbai – दसरा मेळावा हा शिवसैनिकांसाठी मोठं आकर्षण आणि विचारांचे सोनं लुटली जाणारी सभा म्हणून दसरा मेळाव्याकडे पाहिले जाते. दरम्यान, यावर्षी दसरा मेळाव्यात खास आकर्षण असेल आणि जर आत्ताच तुम्हाला ते सांगितलं तर ते आकर्षण राहणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक गुलाल उधळत येतील आणि दसरा मेळावा थाटामाटात साजरा होईल, असं शिवसेना उबाटा गटाचे आमदार महेश सावंत यांनी सांगितले. आज त्यांनी छत्रपती शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

20 कोटीचे रहस्य त्यांनाच विचारा…

शिवसेना शिंदे गटाचे पराभूत आमदार सदा सरवणकर यांनी निधीबाबत एक वक्तव्य केले आहे. की, आमदाराला निधीसाठी पैसे मिळत नाहीत. परंतु मी आमदार नसताना सुद्धा मला निधी म्हणून 20 कोटी रुपये मिळालेत, यावर बोलताना महेश सांवत म्हणाले की, याबाबत आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही विचारले तर त्यांनी यावर भाष्य करणे टाळले. त्यांना कलेक्टर ऑफिसमधून निधी मिळालाय का? तर कलेक्टर ऑफिसमधूनही निधी दिला नसल्याचे सांगण्यात येत आहे. मग 20 कोटी त्यांना कुठून मिळाले?

याचे रहस्य सदा सरवणकर यांनाच विचारा, असं सांवत म्हणाले. विशेष म्हणजे निधीबाबत सर्वच आमदार तक्रार करताहेत. मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, सत्ताधारी आमदार यांनाही निधी मिळाला मिळत नाही. मग हे तर आमदार नाहीत. यांना कसा निधी मिळाला? असं आमदार महेश सावंत यांनी सवार उपस्थित केला.

महाराजांच्या गळ्यातील हार कुजला याचे वाईट वाटते…

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्राची सुरुवात होते. महाराजांच्या युद्ध रणनीतीचा अवलंब जगभरात केला जातो. अशा महाराजांच्या शिवाजी पार्क येथील पुतळ्याची अजिबात देखभाल केली जात नाही. याबाबत मी मंगळवारी मुंबई महानगरपालिका प्रशासक भूषण गगराणी यांची भेट घेतली. १ मे महाराष्ट्र दिनी… महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेदिवशी जो महाराजांच्या गळ्यात फुलांचा हार घातला होता. त्याला आता चार महिने होऊन गेले आहेत. तरी सुद्धा तो हार बदलला नाही. तो हार आणि फुलं कुजली आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याची देखभाल का केली जात नाही?

याबाबत पालिका प्रशासन यांची भेट घेतली. तर पालिका प्रशासन म्हणताहेत की, ते पीडब्ल्यूडीचे काम आहे… पीडब्ल्यूडी दुसऱ्याकडे बोट दाखवते. जबाबदारी कोणीही घेत नाही. परंतु आता पुतळ्याची निगा राखण्यात येईल, असं प्रशासक भूषण गगराणी यांनी म्हटलं आहे. तसेच ज्या-ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात यावेत, आणि त्याचे अक्सेस स्थानिक पोलिसांना देण्यात यावे, अशी आपण मागणी केली असल्याचे आमदार महेश सावंत यांनी सांगितले.


About Author

Astha Sutar

Other Latest News