पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि घटना ही अलीकडच्या काळात डोकेदुखी ठरलेली असताना आता यामध्ये आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. खुद्द आमदारांच्या हत्येचे कट देखील पुण्यात शिजत असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. तळेगाव दाभाडे परिसरात एका कारवाईत 7 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आले होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सुनील शेळकेंच्या हत्येचा कट
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. तळेगाव दाभाडे परिसरात एका कारवाईत 7 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आले होती. त्यांच्याकडून 9 पिस्तूल 42 काडतुसे, धारदार कोयते जप्त करण्यात आले होते. आता या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता याकडे तपासाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून असणार आहे. पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी परिमंडळ 2 पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष तपास समिती स्थापन करण्यात आली आहे.

याबाबत अधिवेशनात सुनील शेळके यांनी लक्षवेधी ही मांडली होती, यावर उत्तर देताना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करू असं म्हटलं होतं, त्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार आता या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
नेमका कोणी रचला हत्येचा कट?
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 26 जुलै 2023 रोजी तळेगाव दाभाडे परिसरात एक कारवाई केली होती. यामध्ये तपासाअंती 7 सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडून 9 पिस्तूल, 42 काडतुसे, धारदार कोयते जप्त करण्यात आले. सर्व आरोपी पुणे, जालना आणि मध्ये प्रदेशातील अट्टल गुन्हेगार आहेत. आरोपींनी आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचला होता, हे देखील तपासात समोर आलं होतं.
अटकेतील आरोपींवर खून, खंडणी, वाहनांची तोडफोड, जाळपोळ, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तळेगाव दाभाडेत यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अतिरिक्त तपास, तसेच अन्य कुणाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का?, याचा सखोल तपास केला जात असल्याचे पिंपरी-चिंचवड परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी माहिती दिली आहे.
शिवाय आता एसआयटीचा तपास या प्रकरणात महत्वाचा ठरणार आहे. कारण, यामध्ये काही राजकीय लागेबांधे आहेत का याचा तपास आगामी काळात केला जाणार आहे. शिवाय शेळकेंनी केलेल्या मागणीनुसार संबंधित आरोपींची देखील चौकशी होणार आहे. मात्र या घटनेमुळे सामान्य नागरिकांच्या जीवाचं काय अशा सवाल देखील उपस्थित राहिलेला आहे.











