Praveen Darekar – भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचा अखेर सुगीचा काळ आलेला आहे. दरेकर त्यांची मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या ठिकाणी वर्णी लागली आहे. महाराष्ट्र स्वयंपुनर्विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची निवड करण्यात आली आहे. या अध्यक्षपदाला मंत्रिपदाचा दर्जा असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण दरेकर यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. तसेच विशेष म्हणजे याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
मंत्रीपदाचा दर्जा देण्यास मुख्यमंत्री यांच्याकडून मान्यता
प्रवीण दरेकर, यांच्या अध्यक्षतेखाली २४ एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतींचा स्वयंपुनर्विकास करण्याकरीता प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून सवलती देण्याबाबत १३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयातील विविध मुद्यांची पुर्तता/अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजनांची शासनास शिफारशी करण्यासाठी अभ्यासगट नेमण्यात आला होता. सदर प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून प्रविण दरेकर, यांना नियुक्त करून त्यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यास विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी यांनी मान्यता दिली आहे.

शासन निर्णयात काय म्हटले आहे?
१) राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या स्वयं / समुह पुनर्विकासाकरीता स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरण स्थापन करण्यात येत आहे.
२) सदर स्वयं/समूह पुनर्विकारा प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदावर प्रवीण दरेकर, मा. विधान परिषद सदस्य यांची नियुक्ती पुढील शासन आदेश होईपर्यंत करण्यात येत आहे.
३) सदर प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, यांना शासन निर्णयान्वये “मंत्रिपदाचा दर्जा” देण्यात येत आहे. सदर अभ्यासगटाने १४ जुलै २०२५ रोजी विधानभवन येथे मुख्यमंत्री फडणवीस यांचेकडे अहवाल सादर केला आहे.
४) सदर अभ्यासगटाने सादर केलेल्या शिफारशींची प्रभावी अंलबजावणी होण्याकरीता स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरण स्थापन करण्यास मुख्यमंत्रीफडणवीस यांची मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच,











