प्रांजल खेवलकरांना ड्रग्ज पार्टी प्रकरणात मोठा दिलासा; फॉरेन्सिक चाचणीच्या अहवालातून मोठा खुलासा

पुण्यातील खराडी भागातील ड्रग्ज पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण, ड्रग्ज सेवनासंदर्भातील फॉरेन्सिक चाचणीचा अहवाल आता समोर आला आहे.

एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांच्या खराडी ड्रग्स पार्टी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा फॉरेन्सिकचा रिपोर्ट पोलिसांना प्राप्त झाला असल्याची माहिती समोर आली आहे. समोर आलेल्या या अहवालामुळे प्रांजल खेवलकर आणि खडसे कुटुंबियांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गेले काही महिने हे प्रकरण खऱ्या अर्थाने चर्चेत होते. त्यानंतर हा ही मोठी बातमी समोर येत आहे.

प्रांजल खेवलकरांना मोठा दिलासा

पुण्यातील खराडी परिसरात कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकर यांना २५ सप्टेंबर रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे. प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती आणि एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. दीड महिन्यांपेक्षा अधिक वेळ प्रांजल खेवलकर तुरुंगात होते. त्यामुळं त्यांना मिळालेला जामीन मोठा दिलासा होता. खेवलकर यांच्यासह इतर आरोपींना देखील जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर समोर आलेल्या या फॉरेन्सिक रिपोट्समुळे प्रांजल खेवलकर आणि खडसे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रकरण नेमकं काय ?

ण्यातील खराडी भागात सुरु असलेल्या एका खोलीतील पार्टीवर पोलिसांनी 27 जुलै रोजी छापा टाकला होता. त्या कारवाईदरम्यान प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली होती.  पुणे पोलिसांनी 27 जुलै रोजी छापा टाकून प्रांजल खेवलकर आणि इतर सात जणांना अटक केली होती. पोलिसांनी खराडीतील त्या खोलीत 25 जुलै रोजी देखील पार्टी झाल्याचा दावा केला होता.  या पार्टीत काही महिलांचा देखील समावेश होता. शिवाय अंमली पदार्थ आढळून आल्याने प्रांजल खेवलकरांसमोरील अडचणी वाढल्या होत्या.

शिवाय या प्रकरणात खेवलकर यांनी काही महिलांटे शोषण केल्याचा आरोप देखील राज्य महिला आयोगाकडून करण्यात आला होता. रूपाली चाकणकर यांनी देखील प्रांजल खेवलकरांवर अनेक गंभीर आरोप केले होते. आता सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रांजल खेवलकर यांची जामीनावर उद्या सुटका होऊ शकते.


About Author

Rohit Shinde

Other Latest News