आपल्या जीवनात अनेक जण एकमेकांच्या वस्तू वापरतात. समजा एखादा लग्न समारंभ आहे, परंतु महिलेच्या गळ्यात काहीच नसेल तर ती महिला दुसऱ्या महिलेच्या गळ्यातील सुवर्ण अलंकार घालते आणि लग्नात जाते. अनेक मुले मुलीही मित्र-मैत्रिणींच्या वस्तू घालून इकडे तिकडे मिरवत असतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार इतरांच्या काही वस्तू आपण घातल्याने किंवा उसने घेतल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे घर नकारात्मक उर्जेने भरू शकते. साहजिकच तुम्हाला विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शक्यतो या वस्तू दुसऱ्याकडून घेऊच नये..या वस्तू नेमक्या आहेत कोणत्या ते आपण जाणून घेऊया..
दागिने –
दागिने केवळ सौंदर्य वाढवत नाहीत तर घराची समृद्धी देखील दर्शवतात. परंतु, दुसऱ्याचे दागिने उदार घेतल्याने आणि शरीरावर चढवल्याने घरामध्ये नकारात्मक वातावरण तयार होते. आर्थिक अडचणी, कौटुंबिक तणाव आणि आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दुसऱ्याने वापरलेले सोने आपण कधीही उसने घेऊ नये.

कपडे
वास्तुशास्त्रानुसार, कधीही कोणाकडून कपडे उधार घेऊ नका. उधार घेतलेले किंवा उसने घेतलेले कपडे घालल्याने दुसऱ्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करू शकते. त्यामुळे मानसिक ताण आणि आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. म्हणून, सामान्य वेळी किंवा विशेष प्रसंगी कधीही उधारीचे कपडे घालू नका.
घड्याळ
वास्तुशास्त्रात घड्याळ ही एक अतिशय महत्त्वाची वस्तू आहे; त्याचा योग्य किंवा अयोग्य वापर थेट व्यक्तीवर परिणाम करतो. म्हणून, कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी, दुसऱ्याने वापरलेले घड्याळ आपण वापरू नये. दुसऱ्याची घड्याळ आपल्या हातात घातल्याने कामात विलंब होऊ शकतो आणि जीवनात अपयश येऊ शकते. तसेच तुमचे घड्याळ सुद्धा दुसऱ्या कोणाला वापरायला देऊ नका.
पुस्तके
वास्तुशास्त्रात पुस्तके देखील खूप महत्वाची आहेत. पुस्तके उधारीचे माध्यम आहेत. म्हणून, कोणाकडूनही पुस्तके उधार घेणे टाळा, कारण ती तुमच्यावर परिणाम करू शकतात. नकारात्मक ऊर्जा दुसऱ्याच्या पुस्तकाला वेढू शकते. अशा परिस्थितीत, जर आपण एखाद्याकडून पुस्तक उधार घेतले आणि ते वापरले तर आपण त्या व्यक्तीच्या नकारात्मक उर्जेचे बळी बनू शकतो.
भांडी
स्वयंपाकघरातून संपूर्ण घरात ऊर्जा फिरते आणि जेव्हा आपण आपल्या स्वयंपाकघरात उधारीची भांडी वापरतो तेव्हा घराची सकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडण्याची शक्यता असते. म्हणून, कधीही कोणाकडून भांडी उधार घेऊ नका. विशेषतः, तुमच्या स्वयंपाकघरात उधार घेतलेली स्टील किंवा तांब्याची भांडी वापरू नका.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











