भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे. यात पहिले तीन वनडे सामने १८ ऑक्टोबरपासून होणार आहेत. यानंतर पाच सामन्यांची टी-२० मालिका २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे. बीसीसीआय शनिवारी ४ ऑक्टोबरला वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाईल. कोहली आणि रोहितला वनडे संघात सामील करण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्याच्या घोषणेकडे क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आहेत.
ऑस्ट्रेलिया वन-डे मालिका रोहित-विराट खेळणार?
आशिया कपमधल्या विजयानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळत आहे. ही सीरिज संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया 3 वनडे आणि 5 टी-20 मॅचची सीरिज खेळेल. 19 ऑक्टोबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या या सीरिजला सुरूवात होणार आहे. या सीरिजसाठी शनिवारी भारतीय टीमची घोषणा केली जाणार आहे, पण वनडे सीरिजसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माची टीम इंडियात निवड होणार का नाही? याबाबत कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात प्रश्न पडला आहे.

ऑस्ट्रेलियामधल्या वनडे सीरिजसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीची निवड होणार आहे, असं वृत्त क्रिकबझने दिलं आहे. ऑस्ट्रेलियामधल्या वनडे आणि टी-20 सीरिजसाठी बीसीसीआय शनिवार 4 ऑक्टोबरला टीमची घोषणा करू शकते, असंही या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं आहे.
रोहित आणि विराटच्या पुनरागमनाची चाहत्यांना प्रतीक्षा
टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित आणि कोहलीने आपला शेवटचा सामना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये खेळला होता. त्यानंतर दोघांनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपापल्या संघाचे प्रतिनिधित्व केले. कोहली आणि रोहितने इंग्लंड दौऱ्याच्या आधी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले होते. यानंतर शुभमन गिलला कसोटी कर्णधार बनवण्यात आले होते.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी-२० आंतरराष्ट्रीयला आधीच निवृत्ती घेतली आहे. दोन्ही खेळाडूंनी २०२४च्या भारताच्या वर्ल्डकप विजयानंतर टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्तीची घोषणा केली होती. अशातच हे दोन्ही खेळाडू केवळ वनडे क्रिकेटसाठी उपलब्ध आहेत. आता कोहली आणि रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघात सामील होऊ शकतात.











