What items should be kept in the south direction of the house: वास्तु शास्त्रानुसार, घरातील प्रत्येक गोष्ट वास्तू शास्त्राप्रमाणे केल्यास घरात सुखसमृद्धी येते अशी मान्यता आहे. त्यामुळे वास्तू शास्त्राचा सल्ला देण्यात येतो. अनेकदा घरात सतत वादविवाद, आर्थिक अडचणी, अपयश अशा गोष्टी सुरु असतात. या समस्या दूर करण्यासाठी वास्तू शास्त्र मदत करते.
घरात सुखसमृद्धी येण्यासाठी वास्तू शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. वास्तू शास्त्राच्या मते, घरातील प्रत्येक वस्तू ठेवण्याची एक योग्य दिशा आणि स्थान असते. त्या नियमांचे पालन न करून वस्तू कुठेही ठेवल्या, तर त्या वस्तू घरात नकारात्मक प्रभाव टाकतात. त्यामुळे घरात अनेक समस्या निर्माण होतात. दुसरीकडे वास्तू शास्त्राच्या नियमांचे पालन करून वस्तू योग्य स्थानी ठेवल्यास त्याचा सकारात्मक प्रभाव पडतो. आज आपण अशा काही वस्तू पाहणार आहोत ज्या घराच्या दक्षिण दिशेत ठेवल्यास फायदा मिळणार आहे. चला पाहूया या वस्तू कोणत्या आहेत….

झाडू-
वास्तू शास्त्रानुसार झाडूला विशेष महत्व आहे. कारण झाडूचा संबंध धनाची देवी लक्ष्मीसोबत जोडला जातो. त्यामुळे झाडू योग्य दिशेत ठेवल्यास लाभ मिळतो. शास्त्रानुसार झाडू नेहमी घराच्या दक्षिण दिशेला ठेवावी. यामुळे घरात नेहमी देवी लक्ष्मी वास करते. आणि घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते.
बेडवरील उशी-
वास्तू शास्त्रानुसार, बेडवरील उशी दक्षिण दिशेला असणे अत्यंत चांगले समजले जाते. त्यामुळे वैवाहिक आयुष्य सुखी होते. पती-पत्नीमधील प्रेम आणि विश्वास वाढतो. तसेच वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर होण्यास मदत होते.
सोने-चांदी-
घरातील मौल्यवान वस्तू जसे कि सोने-चांदी घरातील दक्षिण कोपऱ्यात ठेवणे चांगले असते. असे केल्याने घरात नेहमीच सुखसमृद्धी राहते. आणि घरात कधीच आर्थिक चणचण भासत नाही. त्यामुळे घरातील सोने दक्षिण दिशेला ठेवा.
तुळशी आणि मनीप्लांट-
वास्तू शास्त्रानुसार तुळशी आणि मनीप्लांट घराच्या दक्षिण कोपऱ्याला ठेवल्यास घरात कधीच आर्थिक अडचण येत नाही. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे परत मिळतात. त्यामुळे नेहमीच तुळशी आणि मनी प्लांट या दिशेला ठेवा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











