Feng Shui Tips In Marathi: ज्योतिषशास्त्र, रत्नशास्त्र, वास्तू शास्त्र यांसारखे विविध प्राचीन शास्त्र आहेत. त्याचप्रमाणे चीनमध्ये फेंगशुई शास्त्र प्रसिद्ध आहे. लोक आपल्या अडचणी दूर करण्यासाठी आणि सुखसमृद्धी वाढवण्यासाठी फेंगशुई शास्त्राचा वापर करतात. अनेक चीन, जपानसारख्या अनेक देशांमध्ये फेंगशुई शास्त्र अनेक वर्षांपासून अवलंबले जात आहे.
अलीकडे आपल्या देशातसुद्धा फेंगशुई शास्त्र प्रचलित झाले आहे. अनेक लोक आपल्या अडचणी दूर करून सुखसमृद्धी आणण्यासाठी फेंगशुई शास्त्र फॉलो करत आहेत. फेंगशुई शास्त्रात करिअर, व्यवसाय, धनधान्य आणि सुखसमृद्धी वाढवण्यासाठी अनेक टिप्स सांगण्यात आल्या आहेत. आज आपण आर्थिक चणचण दूर करण्यासाठी काही फेंगशुई टिप्स जाणून घेऊया…..

जेड प्लांट-
फेंगशुई शास्त्रानुसार, वेळूच्या रोपाप्रमाणेच जेड प्लांट ठेवणे अत्यंत चांगले समजले जाते. खासकरून घराच्या प्रवेशद्वारासमोर ठेवणे उत्तम असते. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच घरात सुखसमृद्धी येऊन आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते.
फेंगशुई कासव-
फेंगशुई शास्त्रात फेंगशुई कासव अत्यंत शुभ समजले जाते. फेंगशुई कासव सुखसमृद्धी आणि आर्थिक लाभ आकर्षित करते. त्यामुळे घरात फेंगशुई कासव ठेवणे चांगले असते. या शास्त्रानुसार, घरात उत्तर दिशेला हे कासव ठेवणे अत्यंत चांगले असते. त्यामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होतात आणि सुखसमृद्धी येते.
चिनी नाणे-
फेंगशुई शास्त्रामध्ये चिनी नाण्यांना विशेष महत्व आहे. या शास्त्रानुसार, चिनी नाणी लाल कापडात बांधून तिजोरीमध्ये ठेवल्याने धनधान्यात वाढ होते. आर्थिक चणचण दूर होऊन पैसे आकर्षित होण्यास मदत होते.
लाफिंग बुद्धा-
फेंगशुईनुसार लाफिंग बुद्धा जपान आणि चीनमध्ये सुख, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. आता सर्वच देशांमध्ये लाफिंग बुद्धाचे महत्व माहिती झाले आहे. त्यामुळे आपल्या देशातही अनेकजण लाफिंग बुद्धा घरात ठेवतात. लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने घरामध्ये धन आकर्षित होते. तसेच घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. परंतु अनेक लोक लाफिंग बुद्धा चुकीच्या ठिकाणी किंवा चुकीच्या दिशेला ठेवतात. त्यामुळे त्याचा हवा तसा प्रभाव दिसून येत नाही. त्यामुळे त्याची योग्य दिशा माहिती असणे आवश्यक आहे.
घराची स्वच्छता-
फेंगशुई शास्त्रानुसार घराचा मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवा. घरात स्वच्छता ठेवा. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. घरातील आर्थिक अडचणी दूर होऊन घरात सुखसमृद्धी येते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











