Rohit Sharma Tesla Car : रोहित शर्माची टेस्ला कार; गाडीचा नंबर प्लेट आहे खास

रोहितने आपल्या नव्या कारचा नंबर 3015 असा ठेवला आहे. या दोन्ही अंकातून त्याच्या मुलांची जन्मतारीख दिसून येते

भारताचा हिटमॅन रोहित शर्माने नवी कोरी टेस्ला कार (Rohit Sharma Tesla Car) खरेदी केली आहे. काही महिन्यापूर्वीच टेस्लाकार भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. मुंबईत टेस्ला चे शोरुम उघडलं आहे. अनेकांना या टेस्ला इलेक्ट्रिक कारची भुरळ पडली आहे.  त्यात मुंबईचा राजा म्हणवल्या जाणारा रोहित शर्मा तरी कसा चुकेल. रोहितनेही लागलीच टेस्ला ची इलेक्ट्रिक कार विकत घेतली. रोहितने टेस्ला मॉडेल वाय खरेदी केलं आहे. महत्त्वाचे बाब म्हणजे रोहित ने खरेदी केलेल्या गाडीचा नंबर प्लेट खूपच खास आहे.

६८ लाख रुपयांची टेस्ला कार ( Rohit Sharma Tesla Car)

रोहित शर्माने टेस्ला मॉडेल वाय आरडब्ल्यूडी स्टँडर्ड रेंज व्हेरिएंट मॉडेल खरेदी केले आहे. या इलेक्ट्रिक कार ची किंमत ६७.८९ लाख रुपये आहे. या गाडीमध्ये ७५ किलोवॅट ची बॅटरी बसवण्यात आली असून सिंगल चार्जवर ही इलेक्ट्रिक कार ६२२ किलोमीटर अंतर पार करते. दिसायला या कारचा लुकही खूपच आकर्षक आहे.  (Rohit Sharma Tesla Car) गाडीच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, त्यात सर्व एलईडी लाईट्स, प्रीमियम इंटीरियर, १५.४-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, गरम आणि हवेशीर सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग, ९ स्पीकर्ससह प्रीमियम स्टीरिओ सिस्टम, रियर व्हील ड्राइव्हट्रेन, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड टक्कर वॉर्निंग आहे. आराम, सुविधा आणि सुरक्षिततेशी संबंधित इतर अनेक फिचर्स आहेत.

गाडीला स्पेशल नंबर प्लेट

रोहितने त्याच्या या कारच्या नंबरसाठी विशेष अंकांना प्राधान्य दिल्याचं दिसून येतं. नंबर प्लेटवरील चार अंक हे रोहितसाठी खास आणि अतिशय प्रिय आहेत. रोहितने आपल्या नव्या कारचा नंबर 3015 असा ठेवला आहे. या दोन्ही अंकातून त्याच्या मुलांची जन्मतारीख दिसून येते. 30 डिसेंबर ही रोहितची मुलगी समैराची जन्मतारीख आहे तर 15 नोव्हेंबर या दिवशी रोहितला मुलगा अहानचा जन्म झाला होता.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News