हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला खूप महत्त्व आहे. बाप्पावर मनापासून भक्ती असणारे हे भक्त महिन्यातून एकदा येणारा चतुर्थीचा उपवास आवर्जून करतात. गणपती बाप्पाने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण कराव्यात यासाठी संकष्टी चतुर्थीला अतिशय भक्तीभावाने उपवास केला जातो. चंद्रोदयाला बाप्पांची आरती करुन त्यांना नैवेद्य दाखवायचा असेल तर करता येतील असा सोपा गोडाचा पदार्थ कोणता करता येईल हे आज आपण पाहणार आहोत.
साहित्य
- एक वाटी रवा
- अर्धी वाटी साखर (गोडव्यानुसार कमी-जास्त करू शकता)
- तीन चमचे तूप
- एक कप दूध
- अर्धा कप पाणी
- एक चमचा वेलची पूड
- आवडीनुसार ड्रायफ्रुट्स (काजू, बदाम, मनुका)
कृती
- एका कढईत तूप गरम करा आणि त्यात रवा घालून सोनेरी होईपर्यंत मंद आचेवर भाजा. रवा भाजताना तो चॉकलेटी रंगाचा होऊ देऊ नका.
- दुसऱ्या भांड्यात दूध आणि पाणी एकत्र करून उकळायला ठेवा.
- रवा भाजून झाल्यावर, त्यात हळू हळू उकळलेले दूध आणि पाणी घाला. गुठळ्या होऊ नयेत म्हणून ढवळत रहा.
- शिजल्यावर त्यात साखर, वेलची पूड आणि ड्रायफ्रुट्स घालून चांगले मिक्स करा.
- शिरा तयार झाल्यावर गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवा.












