मुंबई – साल 2019 साली एका संशोधनात असं समोर आलं की प्रत्येकी पाचपैकी दोघांना म्हणजेच सुमारे 40 टक्के जणांना हे माहितच नसतं की त्यांना डायबिटीस आहे. वय वर्ष 45 असलेल्या प्रत्येकी पाच माणसांमागे एका व्यक्तीला डायबिटीस असल्याचं समोर आलंय. सध्या देशात डायबिटीस रुग्णांची संख्या 5 कोटींपेक्षाही जास्त आहे.
डायबिटीसवर लवकर नियंत्रण मिळवलं नाही तर शरीराच्या अनेक अवयवांवर याचा परिणाम होतो. यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक, किडनी निकामी होणं, डोळे कमजोर होणं, पायांना गंभीर समस्या यासारखे आजार होऊ शकतात. हे सगळं असतानाही अनेक भारतीय त्यातही वयस्कर व्यक्ती याकडे जास्तीत जास्त दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतात.

डायबिटीसची लक्षणं माहिती आहे का?
जास्तवेळा तहान लागणं किंवा जास्त वेळा लघुशंकेला जाणं हे डायबिटीसचं प्रथम लक्षण मानण्यात येतं. याआजाराचे दोन प्रकार आहेत. टाईप 1 आणि टाईप 2
टाईप 1 प्रकारात शरीरात इन्सुलिन तयार होत नाही, हा आजार अनेकदा मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये आढळतो.
टाईप 2 प्रकारात शरीरात उन्सुलिनचा योग्य वापर होत नाही, जर तुमचं वजन जास्त असेल आणि कुटुंबात कुणाला डायबिटीस असेल तर धोका अधिक वाढतो.
डायबिटीसचे सुरुवातीची आठ संकेत
1. जास्त भूक लागणे
2. जास्त थकवा येणे
3. जास्त वेळा लघवी येणे 4. खूप तहान लागणे
5. अंधूक दिसणे
6. कोरडी त्वचा आणि खाज
7. तोंडाला कोरड पडणे
8. अचानक वजन कमी होणे
रक्तातील साखर नियंत्रित कशी कराल?
1. समतोल आहार करा
2. कार्ब्स असलेला आहार टाळा
3. रिफाईन्ड कार्ब खाणं टाळा
4. साखर, मध, गोडाचे पदार्थ खाण्याचं प्रमाण कमी करा
5. फायबर, प्रोटिनयुक्त आहार घ्या
6. थोड्या थोड्या वेळानं खाण्याचं टाळा
7. इंटरमिटेंट उपवास सुरु करा
8. ठरलेल्या वेळी ठरलेला आहार करा
9. व्यायाम करा, चाला
10. औषधं वेळच्या वेळी घ्या











