Rock Salt Vs White Salt : सैंधव मीठ आणि पांढरं मीठ यामध्ये फरक काय आहे? कोणतं मीठ जास्त धोकादायक?

अनेकजण सध्या पांढरं मीठ सोडून सैंधव मिठाचा वापर करीत असल्याचं समोर येत आहे. गेल्या काही वर्षात हा ट्रेंड अधिक वाढला आहे.

Rock Salt Vs White Salt: चुकीच्या खाण्याच्या पद्धती आणि ऑफिसमधील तणाव यामुळे लोकांच्या लाइफस्टाइलवर परिणाम होत आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अधिकांश लोक लाइफस्टाइलशी जोडलेल्या आजारांचा सामना करीत आहेत. कोणाला मधुमेह तर कोणाला उच्च रक्तदाबाचा त्रास. अनेकजण सध्या पांढरं मीठ सोडून सैंधव मिठाचा वापर करीत असल्याचं समोर येत आहे. गेल्या काही वर्षात हा ट्रेंड अधिक वाढला आहे. आज आम्ही तुम्हाला गुलाबी रंगाचं मीठ आणि सफेद मीठ यामधील फरक समजावून सांगणार आहोत. या दोघांपैकी कोणतं मीठ आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हेदेखील सांगणार आहोत.

सैंधव मिठाचा ट्रेंड का वाढत आहे?

सैंधव मीठाचा ट्रेंड का वाढत आहे, याबद्दल आधी जाणून घ्यायला हवं. सफेद मीठ विषासमान असल्याच इन्फ्लूएनर्स आणि तज्ज्ञांकडून हेच सांगितलं जात आहे. वारंवार ही गोष्ट सांगितली जात असल्याने लोकही पांढऱ्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करीत आहेत.

सैंधव मीठ आणि पांढरं मीठ यामध्ये फरक काय आहे?

पांढरं मीठ समुद्रातून काढलं जातं. त्यानंतर त्यावर प्रक्रिया होते आणि स्वयंपाकघरार्यंत पोहोचतं. तर सैंधव मीठ समुद्रातून काढलं जात नाही. हे खनिज खाणीतून काढलं जातं. म्हणजे सैंधव मीठ एकप्रकारे नैसर्गिक खनिज आहे. सर्वसाधारणपणे याचा रंग गुलाबी असतो. त्यामुळे या पिंक सॉल्टही म्हटलं जातं. समुद्रातून काढलेल्या मिठात जास्त सोडियम असतं. तर सैंधवन मिठात सोडियम नसतं आणि मॅग्नेशियम, पोटॅशियमसारखी खनिजं असतात.

कोणतं मीठ जास्त धोकादायक?

आरोग्य तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार, मीठ कुठल्याही प्रकारचं असलं तरी मिठाचं जास्त सेवन धोकादायक ठरू शकतं. जेवणात मर्यादित प्रमाणात मीठ घेऊ शकता. साठवलेल्या पदार्थांमध्ये मीठ जास्त प्रमाणात असतं, अशा पदार्थांचं सेवन मर्यादित स्वरुपात करायला हवं. पांढरं मीठ पूर्णपणे बंद करणं योग्य नाही. कारण यातून सोडियमची कमतरता पूर्ण होते. जे लोक विचार न करता केवळ सैंधव मिठाचा वापर करतात त्यांच्यासाठी हे धोकादायक ठरू शकतं.


About Author

Smita Gangurde

Other Latest News