शिवसेना ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते आणि खासदार संजय राऊत यांची प्रकृती अचानकपणे खालावली आहे. संजय राऊत यांना मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात (Sanjay Raut Hospitalized) तातडीने दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे आज सकाळीचा नेहमीप्रमाणे त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या पक्षाची भूमिका रोखठोकपणे मांडली होती. त्यानंतर त्यांना फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या संजय राऊत यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचे कोणतेही कारण नाही.
राऊताना नेमका त्रास काय? Sanjay Raut Hospitalized
संजय राऊत यांना घशाचा त्रास असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी फोर्टिज हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी केली होती. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील छत्रपती संभाजीनगर येथील हंबरडा मोर्चातही सहभाग नोंदवला होता. आज सकाळी ते पुन्हा एकदा नेहमीच्या पत्रकार परिषदेसाठी आले. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांच्या आवाजाबाबत थोडा त्रास दिसत होता. पत्रकार परिषद संपल्यानंतर ते फोर्टिस रुग्णालयात दाखल झाले. Sanjay Raut Hospitalized

संजय राऊत शिवसेनेचा खरा आवाज
संजय राऊत म्हणजे ठाकरे गटाची धडाडीची तोफ… ठाकरे यांच्या शिवसेनेचा खरा आवाज. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे, अजित पवार या सर्व बलाठी विरोधकांना एकाच वेळेस शिंगावर घेणारा आणि बेधडक नेता म्हणजे संजय राऊत. संजय राऊत जे काही बोलतात ते शिवसेना ठाकरे गटाचे अधिकृत भूमिका असते असं म्हटलं जातं. उद्धव ठाकरेंची ते खरे निष्ठावान सैनिक आहेत.











