ऐन दिवाळीत विमान तिकिटांच्या दरात मोठी वाढ; चार पटींनी दर वाढल्याने प्रवाशांमध्ये नाराजी

ऐन दिवाळीत विमान तिकिटांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काही विमान सेवांच्या तिकिटांचे दर दुप्पटीने ते तिप्पटीने वाढले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये सध्या कमालीची नाराजी पाहायला मिळत आहे.

दिवाळीच्या काळात विमान प्रवासाला प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते. या काळात अनेकजण आपल्या गावी जाण्यासाठी किंवा सुट्टीसाठी प्रवासाचे नियोजन करतात. रेल्वे आणि बसमध्ये गर्दी असल्यामुळे विमान प्रवास हा अधिक सोयीस्कर आणि वेळ वाचवणारा पर्याय ठरतो. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणांची मागणी वाढते. मात्र आता ऐन दिवाळीत विमान कंपन्यांनी प्रवाशांना चांगलाच झटका दिला आहे. कारण विमानांच्या तिकीट दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. 

विमानांचे तिकिट दर वाढले!

दिवाळी जस जशी जवळ येत आहे, तसे विमानाच्या तिकिटांच्या किमती गगनाला भिडत आहेत. दिवाळीच्या काळात मुंबई, बंगळुरू, पुणे, हैदराबाद या शहरांमधून मोठ्या प्रमाणात प्रवासी विमानाने प्रवास करतात. या काळाता गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. परंतु यंदा दिवाळीत विमान तिकीटांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मुंबईहून निघणाऱ्या फ्लाइट्सचे दर सामान्यपेक्षा तब्बल चार ते सहा पटींनी वाढले आहेत, तर दिल्लीहून उड्डाण घेणाऱ्या विमानांचे दर तीन ते चार पटींनी महागले आहेत.

या वर्षी हा प्रवास खिशाला चांगलाच महाग पडणार आहे. कारण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विमान तिकिटांचे दर झपाट्याने वाढले आहेत. काही मार्गांवर तर विमान तिकिटांच्या किमती कैक पटींनी वाढल्या आहेत. रेल्वेची तिकिटे दिवाळीपूर्वीच बूक झाल्याने आता विमान प्रवासाचा पर्याय प्रवाशांसमोर आहे. परंतु आता त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात खिसा रिकामा करावा लागणार आहे. प्रवाशांमधून देखील यावर चांगलीच नाराजी सध्या व्यक्त केली जात आहे. सणासुदीचा काळ जवळ आल्याने मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांतून गावी परतणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. परिणामी विमान भाड्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

विमान प्रवासाकडे कल वाढला!

विमान प्रवासाची मागणी तब्बल 70 टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे तिकीट दरातही मोठी वाढ दिसून येते आहे. दिवाळीच्या काळात ते हैदराबाद–जयपूर मार्गावरील तिकिटांचे दर 6500 रुपयांवरून 12,000 रुपयांपर्यंत गेले आहेत, तर हैदराबाद–दिल्ली तिकिटाचे दर 4000 रुपयांवरून 7000 ते 12000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. गेल्या वर्षी तिकीटदरात 20 ते 30 टक्क्यांनी घट झाली होती, पण यंदा तिकीट दरांत मोठी वाढ झाली आहे. सणासुदीच्या काळात बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई या मार्गांवरील प्रवासाची मागणी सर्वाधिक असल्याने दर वाढत आहेत. त्यामुळे दिवाळीत विमान प्रवासाचा प्लान करणाऱ्यांनी लवकर तिकिटे बुक करणे अत्यावश्यक ठरणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News