दिवाळी अवघ्या चार दिवसांवर आली आहे. महिलांची फराळाची तयारी जोरदार सुरु आहे. जवळपास दिवाळीचा फराळ बनवून तयार झाला आहे. दिवाळी म्हटली की उत्साह आणि आनंदाचे वातावरण असते. हाच आनंद द्विगुणित होण्यासाठी आपण सणाच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी एकत्र येण्याचे ठरवतो. पण पाहुण्यांना बोलावल्यावर जेवायला काय करायचे असा प्रश्न आपल्यासमोर असतो. झटपट होईल, सगळ्यांना आवडेल असे काहीतरी करायचे असेल तर म्हणूनच या दिवाळीत तुमच्याघरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी पनीर बिर्याणीचा बेत करा. जाणून घेऊयात रेसिपी…
साहित्य
- बासमती तांदूळ
- पनीर
- दही
- कांदे
- टोमॅटो
- कोथिंबीर,पुदिना
- तूप
- मीठ
- मसाले (आले-लसूण पेस्ट , हिरवी मिरची, लाल तिखट,हळद, गरम मसाला, बिर्याणी मसाला)
- खडे मसाले (तमालपत्र, दालचिनी , लवंगा, वेलदोडे)
कृती
- पनीर बिर्याणी बनवण्यासाठी सर्वप्रथम बासमती तांदूळ स्वच्छ धुवा आणि २ कप पाणी, १ चमचा तेल घालून शिजवून घ्या.
- दुसरीकडे एका बाऊलमध्ये १५ -२० मिनिटांसाठी पनीर मॅरिनेट करण्यासाठी ठेवा. त्यात दही, आले-लसूण पेस्ट, लाल तिखट, हळद, बिर्याणी मसाला, मीठ, कोथिंबीर आणि पुदिना मिक्स करा.
- आता पॅनमध्ये तूप टाकून बारीक चिरलेले कांदे गोल्डन फ्राय करा. त्यात टोमॅटो, खडे मसाले, हिरव्या मिरची टाकून परतून घ्या. त्यानंतर मॅरिनेट केलेले पनीर टाकून ५-७ मिनिटे शिजवा.
- आता एका मोठ्या भांड्यात तूप टाकून पहिला शिजवलेला बासमती राइस मग पनीर ग्रेव्हीचा थर लावा. असे दोन-तीन वेळा करा आणि १० मिनिटे चांगली शिजवा. शेवटी कोथिंबीर, पुदिना यांनी बिर्याणी सजवा.
- गरमगरम पनीर बिर्याणी सर्व्ह करा.












