Jalna News: जालना महापालिकेचा आयुक्त लाचलुचपतच्या जाळ्यात; 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं !

जालनात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकरांना 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.

अलीकडच्या काळात सरकारी अधिकाऱ्यांकडून लाचखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. अनेक विभागांमध्ये नागरिकांच्या कामासाठी लाच मागितली जात असल्याच्या तक्रारी सतत येत आहेत. शासनाने पारदर्शकता वाढवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असल्या तरी प्रत्यक्षात काही ठिकाणी भ्रष्टाचार थांबलेला नाही. याचा प्रत्यय नुकताच जालना शहरात आला.

महापालिका आयुक्त लाचलुचपतच्या जाळ्यात

जालनात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकरांना 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. या प्रकरणामुळे पालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयुक्त खांडेकर यांनी एका बांधकाम कंत्राटदाराकडून त्याचे बिल मंजूर करण्यासाठी मोठी लाच मागितली होती.

या प्रकरणी पीडित कंत्राटदाराने छत्रपती संभाजीनगर येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. तक्रारीची पुष्टी झाल्यानंतर, एसीबी पथकाने एक गुप्त सापळा रचला आणि गुरुवारी संध्याकाळी, आयुक्त खांडेकर त्यांच्या अधिकृत निवासस्थानी लाचेची रक्कम स्वीकारत असताना, एसीबीने घटनास्थळी छापा टाकला आणि त्यांना घटनास्थळी अटक केली.

यंत्रणेकडून प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू

सर्व कागदपत्रे, मोबाईल रेकॉर्डिंग आणि पुरावे जप्त करण्यात आले आहेत. कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. या घटनेमुळे महापालिकेच्या प्रशासकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिक आणि सामाजिक संघटनांनी भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. संबंधित यंत्रणेकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास आता सुरू करण्यात आला आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News