बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि चर्चेत असलेले सेलिब्रिटी कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी आपल्या कन्येचा ‘दुआचा’ पहिल्यांदाच चेहरा जगासमोर (Ranveer Deepika Daughter Pic) आणला आहे. दिवाळीच्या खास निमित्ताने दीपिका आणि रणवीरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही सुंदर कौटुंबिक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये त्यांची लाडकी मुलगी दुआ पहिल्यांदाच सर्वांसमोर आली आहे. फोटो शेअर होताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आणि काही वेळातच हे फोटो व्हायरल झाले.
काय आहे फोटो मध्ये? Ranveer Deepika Daughter Pic
दीपिका आणि रणवीरने शेअर केलेल्या फोटोंमध्ये दुआने तिच्या आईसोबत जुळणारा, लाल रंगाचा पारंपरिक सब्यसाची ड्रेस परिधान केला आहे. आई आणि मुलगी दोघीही अत्यंत आकर्षक आणि देखण्या दिसत आहेत. दुआच्या चेहऱ्यात रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण दोघांचीही झलक दिसून येत आहे. यामुळेच सोशल मीडियावर दीपवीरचे चाहते दोन भागांमध्ये विभागले गेले आहेत. काही चाहत्यांना दुआचे चेहरेपट्टी रणवीरसारखे वाटत आहेत, तर काहींना ती अगदी लहान दीपिकासारखी भासते आहे. (Ranveer Deepika Daughter Pic)

दीपिकाच्या बालपणीचे फोटोही
या चर्चेच्या पार्श्वभूमीवर दीपिकाच्या बालपणीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. हे फोटो पाहून अनेकजण म्हणत आहेत की दुआ म्हणजे अगदी लहानपणीची दीपिकाच आहे. दुसरीकडे, रणवीरच्या चाहत्यांचा दावा आहे की दुआच्या डोळ्यांत आणि हसण्यात रणवीरची झलक स्पष्टपणे दिसते.
दुआचा जन्म ८ सप्टेंबर २०२४ रोजी झाला होता. तिच्या जन्मानंतर बराच काळ हा सेलिब्रिटी कपल आपली मुलगी आणि तिचे फोटो सोशल मीडियापासून दूर ठेवत होते. मात्र यंदाच्या दिवाळीत, चाहत्यांना एक खास सरप्राइझ देत त्यांनी दुआचा फोटो शेअर केला.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी २०१८ साली विवाह केला होता. त्यांच्या लग्नाच्या अनेक आठवणी आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत. आता त्यांच्या आयुष्यात दुआच्या आगमनाने एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. दीपवीर फॅन्ससाठी ही दिवाळी आणखी खास ठरली आहे.











