फक्त नीरज नाही… ‘लेफ्टनंट कर्नल’ नीरज चोप्रा म्हणा, राजनाथ सिंह यांच्या हस्ते सन्मानित

भारताचे स्टार ऑलिम्पिक अ‍ॅथलीट नीरज चोप्रा यांना बुधवारी भारतीय लष्करात ‘लेफ्टनंट कर्नल’ पद देण्यात आले आहे. क्रीडा क्षेत्रातील मोठ्या यशासाठी आणि तरुणांना प्रेरणा देण्यासाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला. दिल्ली येथे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत त्यांना हे पद प्रदान करण्यात आले.

नीरज चोप्रा यांनी 2016 मध्ये नायब सुभेदार म्हणून भारतीय लष्करात प्रवेश केला होता. त्यानंतर 2021 मध्ये त्यांची सुभेदारपदी पदोन्नती करण्यात आली.

द गॅझेट ऑफ इंडियानुसार, ‘लेफ्टनंट कर्नल’ पदाची ही मानद नियुक्ती 16 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आली आहे.

सुवर्ण कामगिरी आणि पुरस्कारांचा गौरव

  • नीरज चोप्रा यांना 2018 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • 2021 मध्ये टोकियो ऑलिंपिकमध्ये पुरुष भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकत त्यांनी इतिहास रचला.

  • याच यशानंतर त्यांना खेलरत्न पुरस्कार मिळाला, जो देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे.

  • त्यांच्या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे, 2022 मध्ये त्यांना सुभेदार मेजरपदी पदोन्नती देण्यात आली.

  • त्याच वर्षी, त्यांना देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मश्री’ प्रदान करण्यात आला.

  • भारतीय लष्कराचा सर्वोच्च शांतताकालीन सन्मान ‘परम विशिष्ट सेवा पदक’ देखील त्यांना 2022 मध्ये प्राप्त झाला.

नीरज चोप्रा यांनी भारतीय अ‍ॅथलेटिक्समध्ये नवा इतिहास घडवला, विशेषतः भालाफेकीसारख्या प्रकारात तरुण पिढीला प्रेरणा दिली. त्यांनी देशात या खेळाबद्दल नवे आकर्षण निर्माण केले.

अलीकडील कामगिरी

नीरज चोप्रा यांची शेवटची झलक जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत पाहायला मिळाली, जिथे त्यांना आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.


About Author

Jitendra bhatavdekar

Other Latest News