Vastu Tips : कामधेनू गायीचं महत्व काय? जाणून घ्या पूजा पद्धत…

समुद्र मंथनाच्या वेळी निघालेल्या 14 रत्नांपैकी एक कामधेनु गाय होती.

आपल्याकडे गायीला देवाचे स्थान देण्यात आले आहे. कामधेनु गोमातेचे पूजन केले जाते. गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा वास असल्याची समजूत अगदी प्राचीन काळापासून प्रचलित असल्याचे दिसून येते. वास्तुशास्त्रानुसार, घरात कामधेनु गायीची प्रतिमा ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख समृद्धी येते. तसेच कामधेनु गायीची पुजा केल्याने भगवान श्रीकृष्ण सुद्धा प्रसत्न होतात आणि आपल्या भक्तांवर ते विशेष कृपा करतात.

कामधेनू गाय

समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. दैवी गाय कामधेनू सात महान देवांची देणगी म्हणून उदयास आली अशी मान्यता आहे. भगवान श्रीकृष्ण, विष्णू अवताराशीही त्याचा संबंध आहे.

कामधेनू गायीचे महत्त्व

कामधेनू गायीला समृद्धी आणि संपत्तीचे प्रतीक मानले जाते. घरात मूर्ती ठेवल्याने घरात भरभराट होते, असे मानले जाते. कामधेनू गाय ही इच्छा पूर्ण करणारी गाय म्हणून ओळखली जाते. तिच्या पूजेमुळे इच्छित फळ मिळते.  कामधेनूच्या दर्शनाने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि नकारात्मकता दूर होते. या गायीची मूर्ती घरात ठेवल्याने शांतता आणि सुसंवाद वाढतो. कामधेनूच्या पूजेमुळे आध्यात्मिक उन्नती होते आणि मानसिक शांती मिळते. 

पूजा करण्याची पद्धत

  • कामधेनूची मूर्ती प्रार्थनागृहात किंवा घरातील कोणत्याही शुभ ठिकाणी स्थापित करा.
  • कामधेनूची मूर्ती एका चौरंगावर ठेवा.
  • नंतर शंख वाजवून पूजा सुरू करा.
  • शुद्ध तुपाचा दिवा लावा.
  • मूर्तीवर गंगाजल शिंपडा.
  • कामधेनूला ताजी फुले आणि हार अर्पण करा.
  • कामधेनूला अक्षत अर्पण करा.
  • कामधेनूची पूजा करताना मंत्रांचा जप करा.
  • ॐ कामधेनु नमः
  • ॐ श्री कामधेनु देवी नमः
  • कामधेनुची आरती करा.

वास्तू नियमांनुसार

  • कामधेनू गायीची मूर्ती घरात योग्य ठिकाणी ठेवल्यास घरात समृद्धी येते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
  • कामधेनू गायीच्या दर्शनाने चिंता आणि तणाव कमी होतो असे मानले जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News