Tulsi Vivah 2025 : तुळशी विवाह वाचा यामागची पौराणिक कथा आणि महत्त्व…

तुळशी विवाह कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी किंवा द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत केला जातो. तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे रोप (वृंदा) आणि भगवान विष्णूचे शालिग्राम रूप (कृष्ण/विष्णू) यांचा विवाह लावण्याचा सोहळा होय.

दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. तुळशीचे लग्न अगदी थाटामाटात पार पडल्यानंतर अनेक शुभ कार्याला सुरुवात होते. तुळशी विवाहापूर्वी देवउठणी एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो. तुळशी विवाहाची पौराणिक कथा आणि महत्व जाणून घ्या…

तुळशी विवाहाचे महत्त्व

तुळशी विवाहानंतर लग्नासारख्या शुभ कार्यांसाठी मुहूर्त सुरू होतात. या विवाहामुळे कन्यादान केल्याचे पुण्य मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. तुळशीचे रोप हे पवित्र मानले जाते आणि विष्णूचा शालिग्राम अवतार याच्याशी तिचा विवाह लावणे हे एक महत्त्वाचे आध्यात्मिक कार्य मानले जाते. तुळशी विवाह कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशी किंवा द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत केला जातो. तुळशी विवाहाचे महत्त्व हे वृंदा (तुळस) आणि भगवान विष्णू (शालिग्राम रूपात) यांच्या विवाह सोहळ्यात आहे, जो कार्तिक महिन्यातील एकादशी किंवा द्वादशी ते पौर्णिमेदरम्यान साजरा होतो. या विवाहामुळे कन्यादानाचे पुण्य मिळते, असे मानले जाते आणि यानंतर लग्नाचे शुभमुहूर्त सुरू होतात.

तुळशी विवाहाची कथा

पौराणिक कथेनुसार, एकदा जालंधर नावाचा एक पराक्रमी राक्षस होता, ज्याचा विवाह वृंदा नावाच्या मुलीशी झाला होता. जालंधर नावाच्या महापराक्रमी राक्षसाची पत्नी वृंदा ही अत्यंत पतिव्रता होती. तिच्या पातिव्रत्यामुळे जालंधरला कोणीही हरवू शकत नव्हते. देवांनी विष्णूची मदत मागितलीविष्णूंनी जालंधरचे रूप घेऊन वृंदेचे पातिव्रत्य भंग केले, ज्यामुळे जालंधरचा वध झाला. या घटनेने व्यथित झालेल्या वृंदेने देहत्याग केला. भगवान विष्णूंनी तिला तुळशीचे रोप होण्याचा वर दिला आणि स्वतः शालिग्राम रूपात तिच्याशी विवाह केला. याच घटनेचे स्मरण म्हणून तुळशी विवाह साजरा केला जातो.  तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य मिळते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News