Tulsi Vivah 2025 : तुळशी विवाहाच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या…

तुळशी विवाहाच्या दिवशी काही गोष्टी करणे वर्ज्य मानले जाते.  जाणून घेऊयात. या दिवशी दिवशी काय करावे आणि काय करू नये...

दरवर्षी कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. देव प्रबोधिनी एकादशी किंवा देवोत्थान एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह केला जातो. तसेच तुळशी विवाहानंतरच आपण शुभ कामांना सुरूवात होते. आपल्या हिंदू धर्मात तुळशी विवाहाचे विशेष महत्त्व आहे आणि हा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. तुळशी मातेला देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते आणि असे म्हटले जाते की लक्ष्मी माता तुळशीमध्ये वास करते. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी मातेची पूजा करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या वर्षी, तुळशी विवाह 2 नोव्हेंबर रोजी आहे. त्यामुळे आपल्यापैकी अनेकांकडे यादिवशी भगवान विष्णूचे प्रतीक असलेल्या शालिग्राम आणि तुळशी मातेचा विवाह केला जातो. तुळशी विवाहाच्या दिवशी काही गोष्टी करणे वर्ज्य मानले जाते.  जाणून घेऊयात. या दिवशी दिवशी काय करावे आणि काय करू नये…

तुळशी विवाहाच्या दिवशी काय करावे 

  • तुळशी आणि शालिग्राम यांचा विवाह सोहळा प्रतीकात्मक पद्धतीने पार पाडावा.
  • तुळशीला फुले, फळे आणि मिठाई अर्पण करावी.
  • विवाह मंत्रांचा जप करावा.
  • तुळशीच्या रोपाभोवती आणि शालिग्रामच्या भोवती सात फेरे घ्यावे.
  • पूजा झाल्यानंतर आरती करावी आणि तयार केलेला प्रसाद वाटप करावा. 

तुळशी विवाहाच्या दिवशी काय करू नये 

  • तुळशी विवाहाच्या दिवशी चुकूनही तुळशीची पाने तोडू नये.
  • या दिवशी घरात मांस, मासे असे पदार्थ बनवू नयेत.
  • या दिवशी केवळ सात्विक अन्नच खावे.
  • विवाहाच्या दिवशी नकारात्मक विचार टाळावेत.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News