नाश्त्यासाठी बनवा पौष्टिक राजगिऱ्याचा उपमा, पाहा सोपी रेसिपी

राजगिरा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यातील पोषक घटक पूरक अँटीऑक्सिडंट थेरपी म्हणून काम करतात.

How to make amaranth or rajgira upma:  महिलांना सकाळी-सकाळी नाश्ता बनवण्याची घाईगडबड असते. दररोज काय बनवावे असा प्रश्नही पडतो. तसेच बहुतेक लोकांना चविष्ट पण त्यासोबतच हेल्दी खाणे आवडते. आज आपण अशीच एक चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी पाहणार आहोत. आज आपण राजगिऱ्याचा उपमा कसा बनवायचा ते जाणून घेऊया…..

राजगिऱ्याचा उपमा बनवण्यासाठी साहित्य-

राजगिरा- २कप

टोमॅटो- २ बारीक चिरलेले

वाटाणे- १ कप

कांदा- १ चिरलेला

हिरव्या मिरच्या- २ बारीक चिरलेल्या

कढीपत्ता- गरजेनुसार

मीठ- गरजेनुसार

राजगिऱ्याचा उपमा बनवण्याची रेसिपी-

एका कढईमध्ये तेल गरम करा. त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, मीठ घालून भाजून घ्या.

आता त्यामध्ये कढीपत्ता आणि जिरे घालून तडतडू द्या.

नंतर त्यामध्ये टोमॅटो आणि हिरवे वाटाणे घालून चांगले शिजवून घ्या.

आता त्यामध्ये राजगिरा घालून चांगले एक कप पाणी घालून चांगले मिसळून घ्या.

राजगिरा शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर घालून सजावट करा.

अशाप्रकारे उपवासाचा राजगिरा उपमा तयार आहे.

राजगिऱ्याचे आरोग्यदायी फायदे-

हाडे मजबूत करते-
राजगिरा हाडे मजबूत करण्यास मदत करते. त्यात पुरेशा प्रमाणात कॅल्शियम असते. त्याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. तसेच, राजगिरा खाल्ल्याने दात मजबूत होण्यास मदत होते.

शरीराची सूज कमी करण्यास मदत करते-
राजगिरा खाल्ल्याने शरीराची सूज कमी करता येते. खरं तर, राजगिरामध्ये अँटी-इंफ्लीमेंट्री गुणधर्म आढळतात, ज्यामुळे सूज कमी होते. ज्या महिलांना गरोदरपणात हातपायांमध्ये जास्त सूज येते त्या राजगिरापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकतात.

रक्तातील साखर नियंत्रित करते-
राजगिरा खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यातील पोषक घटक पूरक अँटीऑक्सिडंट थेरपी म्हणून काम करतात. ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते-
राजगिरा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी देखील खाल्ला जातो. राजगिऱ्यामध्ये पुरेशा प्रमाणात झिंक असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच, राजगिरा व्हिटॅमिन-ए चा चांगला स्रोत आहे. ज्यामुळे ते रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगले समजले जाते.


About Author

Aiman Jahangir Desai

Other Latest News