Tulsi Vivah 2025 Mantra : तुळशी विवाहावेळी म्हणा हे मंत्र; आर्थिक स्थिती होईल मजबुत 

असे मानले जाते की तुळशी विवाहाच्या दिवशी पूजा आणि मंत्रांचा जप केल्याने आनंद, शांती आणि समृद्धी मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मंत्राबाबत सांगणार आहोत ज्याचा तुम्हालाही मोठा फायदा होईल.

दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या बाराव्या दिवशी तुळशी विवाहाचा (Tulsi Vivah 2025 Mantra) पवित्र सण साजरा केला जातो. या दिवशी तुळशी माता आणि भगवान विष्णू यांचे लग्न होते. तुळशी विवाहाचा सण सौभाग्य, समृद्धी आणि कौटुंबिक आनंदाचे प्रतीक मानला जातो. भक्ती आणि पूर्ण विधींनी केला जाणारा हा विधी जीवनात सकारात्मक ऊर्जा भरते. असे मानले जाते की तुळशी विवाहाच्या दिवशी पूजा आणि मंत्रांचा जप केल्याने आनंद, शांती आणि समृद्धी मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मंत्राबाबत सांगणार आहोत ज्याचा तुम्हालाही मोठा फायदा होईल.

आर्थिक समृद्धीसाठी कोणता मंत्र? Tulsi Vivah 2025 Mantra

तुळशी मातेला महालक्ष्मीचे रूप मानले जाते. या मंत्राचा जप केल्याने घरामध्ये धन आणि सौभाग्य वाढते.

तुलसी श्रीमहालक्ष्मीरविद्या यशस्विनी ।

धर्म्या धर्मान्ना देवी देवीदेवमनः प्रिया ।

लभते सूत्र भक्तिमन्ते विष्णुपदम् लभेत् ।

लासी भूरमहलक्ष्मीः पद्मिनी श्रीहरहरप्रिया । Tulsi Vivah 2025 Mantra

तुळशी विवाह कधी? 

यंदा 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 07 वाजून 31 मिनिटांनी शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला सुरूवात होईल. तसेच हा तिथी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 05 वाजून 07 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार, तुळशी विवाह 2 नोव्हेंबर 2025 रोजी साजरा केला जाईल.

तुळशी विवाह पूजाविधी

तुळशी विवाहाची तयारी करताना सर्वात प्रथम पूजेचे साहित्य घरी आणावे.

त्यानंतर तुळशीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. तुळस जर कुंडीत लावली असेल किंवा वृंदावन मध्ये लावली असेल तर कुंडीला छान रंगवून घ्यावे, सजवावे.

त्यानंतर शुभ मुहूर्तावर तुळशीची पूजा करावी. साज शृंगार तुळशीला चढवावा, फळे,फुले हार हळद कुंकू तुळशीला अर्पण करावे.

धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी. त्यानंतर श्रीकृष्णाची किंवा बाळकृष्णाची मूर्ती तुळशीच्या समोर चौरंगावर मूर्ती ठेवून पूजा करावी.

मग अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणावे व तुळशीचा विवाह संपन्न करावा.

काहीजण घरीच स्वतः पूजा करतात तर काहीजण ब्राम्हणाला बोलावून विवाह पार पाडतात.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News