Bhagvan Shiv : आज सोमवार, वाचा भगवान शिवाची संपूर्ण आरती

आरती म्हटल्याने शंकराची कृपा लवकर होते आणि मनोवांछित फळ मिळते अशी श्रद्धा आहे.

“लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा” ही संत रामदास स्वामींनी रचलेली शंकराची प्रसिद्ध आरती आहे. ही आरती भगवान शंकराच्या समुद्रमंथनातील हलाहल विष पिऊन केलेल्या भूमिकेचे वर्णन करते.

“लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा” आरतीचे महत्व

“लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा” ही संत रामदास स्वामींनी रचलेली शंकराची प्रसिद्ध आरती आहे.  समुद्रमंथनाच्या वेळी त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे वर्णन करते. ही आरती पठण केल्याने भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते. संत रामदास स्वामी यांनी १७ व्या शतकात या आर यांची रचना केली आहे. ही आरती भगवान शिवाच्या तेजस्वी आणि भव्य स्वरूपाचे वर्णन करते.

भगवान शंकराची आरती

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ २ ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ४ ॥
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News