माणसाच्या शरीरावर तीळ हे असतेच, त्याशिवाय माणसाचं अंगच भरत नाही असं म्हटलं जातं. काहीजणांच्या नाकावरती असतं, काहींच्या पोटावर तीळ असते, काहींच्या ओठावरती असतं, तर काहींच्या पायावरती तीळ असतं. अंगावर तीळ असणे ही तशी म्हणली तर सामान्य गोष्ट आहे. परंतु समुद्र शास्त्रानुसार हे तीळ शरीराच्या कोणत्या भागावर आहे यावर आपलं नशीब अवलंबून असतं. शरीरावरील अनेक तीळांपैकी काही भाग्यवान मानले जातात. हे तीळ शुभ मानले जातात. या शरीराच्या भागांवर तीळ असणे महत्त्वाचे मानले जाते.
नाभीवर तीळ
नाभीवर आणि आजूबाजूला तीळ असलेल्या लोकांना खाऊन पिऊन मस्त जीवन जगायला आवडते . हे लोक आयुष्यात कसले गोष्टीचे टेन्शन घेत नाहीत. कारण नाभीच्या आसपास तीळ असलेले लोक हे जन्मताच श्रीमंत असतात.

तळहातावर तीळ
ज्यांच्या तळहाताच्या आतील बाजूस तीळ असतो त्यांना सतत पैशाचा ओघ येतो. सतत कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्यांच्या हातात पैसा हा येतोच. खास करून उजव्या तळहातावर तीळ असलेल्यांना व्यवसायात चांगले यश मिळते.
छातीवर तीळ
छातीवर तीळ असलेले लोक भाग्यवान मानले जातात. त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. त्यांच्यावर नेहमीच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. या व्यक्ती ज्या ज्या क्षेत्रात पाऊल टाकतात त्या त्या क्षेत्रात यशस्वी होतात.
कानावर तीळ
ज्या व्यक्तींच्या कानावर तीळ असते अति लवकर शांत स्वभावाचे असतात. तसेच त्यांच्या मनात खूप समजूतदारपणा असतो. त्यामुळे परिस्थिती कशीहीअसली तरी ते आपल्या संयमाने सर्व गोष्टी हाताळतात. समुद्रशास्त्रानुसार, असे लोक बुद्धिमान असतात आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये नेहमीच यश मिळवतात.
गालावर तीळ
छाती प्रमाणे, गालावर तीळ देखील शुभ मानला जातो. असे लोक भाग्यवान असतात. त्यांना एक चांगला जीवनसाथी मिळतो. ते त्यांच्या जोडीदारांशी निष्ठावान असतात. मात्र डाव्या गालावर तीळ असलेले लोक वारेमाप पैसा खर्च करतात पैशाची उधळपट्टी करतात.
ओठांवर तीळ
ओठांवर तीळ असलेले लोक जीवनात नेहमीच यशस्वी असतात. सामुद्रिक शास्त्रानुसार, त्यांचे सर्व प्रयत्न यशस्वी होतात. या लोकांना सौभाग्याचे आशीर्वाद मिळतात.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











