Guru Nanak Jayanti Wishes : गुरु नानक जयंती निमित्त प्रियजणांना पाठवा ‘हे’ खास शुभेच्छा संदेश

शीख धर्माचे मुख्य धार्मिक स्थळ म्हणजे गुरुद्वारा हे गुरू नानकजींनी आपले कुटुंब सोडून भारतासह अनेक देशांमध्ये प्रवास करून धार्मिक एकतेची शिकवण सर्वत्र पसरवली.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक गुरु नानक देव यांची जयंती साजरी केली जाते. या वर्षी बुधवार, 5 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा असून, या दिवशी मोठ्या थाटामाटात गुरु नानक जयंती देखील साजरी केली जाईल. लोक हा पवित्र दिवस प्रकाश उत्सव आणि गुरु पर्व म्हणून साजरा करतात. शीख धर्मावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसाठी हा दिवस खूप खास आहे. गुरु नानक जयंती निमित्त आपल्या प्रियजणांना हे खास शुभेच्छा संदेश पाठवून दिवसाचा आनंद द्विगुणीत करा…

गुरू नानक जयंतीचे महत्व

गुरू नानक जयंती, ज्याला ‘गुरुपूरब’ किंवा ‘प्रकाश उत्सव’ असेही म्हणतात, हा शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले शीख गुरू, गुरू नानक देव जी यांचा जन्मदिवस आहे. गुरु नानक जयंतीचे शिख धर्मीयांसाठी अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. शीख धर्माचे पहिले गुरू मानले जाणारे गुरू नानक देव यांचे जीवन आणि शिकवण यांचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. गुरू नानक देव यांनी नेहमीच समानता, प्रेम, सेवा आणि प्रामाणिकपणा या तत्त्वांवर भर दिला. या दिवशी लोक जात-धर्माचा विचार न करता सर्वांप्रती बंधुता आणि सहिष्णुतेची भावना अंगीकारण्याचा संकल्प करतात.  गुरु नानक देव यांनी शिकवले की जात, धर्म किंवा लिंग कोणताही असो, प्रत्येक व्यक्ती देवाच्या इच्छेने निर्माण झाली आहे आणि सर्वांना समानतेने वागवले पाहिजे. गुरु नानक जयंती हा त्यांच्या शिकवणींचे स्मरण करण्याचा आणि त्या आचरणात आणण्याचा दिवस आहे.

गुरु नानक जयंती निमित्त शुभेच्छा संदेश

शिख धर्माचे संस्थापक आणि प्रथम गुरु,
गुरु नानक देव यांच्या जयंतीदिनी
त्यांना विनम्र अभिवादन
गुरू नानक जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

जगाला एकता, श्रद्धा आणि
प्रेमाचा संदेश देणारे गुरू नानक
यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

तुमची जन्मोजन्मी साथ मिळो
सर्वांजवळ आनंदाची वार्ता असो
जीवनात कोणती अडचण आली तरी
नेहमी गुरु नानक देवाच आशीर्वाद लाभो
गुरू नानक जयंतीच्या शुभेच्छा!

शीख बांधवांचे गुरु,
गुरु नानक यांच्या जयंती निमित्त
सर्व शीख बांधवाना खूप खूप शुभेच्छा !

जगातील सर्व मानव समान आहेत
असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक
गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

वाहेगुरु जी का खालसा
वाहे गुरु जी की फतेह।
गुरू नानक जयंतीच्या
मन:पूर्वक शुभेच्छा!

या जगाच्या मोह-मायेपासून लांब राहो
वाहे गुरुच्या कृपेने आनंदाचे क्षण लाभो, हीच प्रार्थना
गुरु नानक जयंती निमित्त सर्वांना भरपूर शुभेच्छा!

इक ओंकार सतनाम करता पुरख
निर्मोह निरवैर अकाल मूरत…
गुरू नानक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!

जगाला एकता, श्रद्धा आणि प्रेमाचा संदेश देणारे
शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक
यांच्या जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

‘कुणीही हिंदू नाही आणि कुणीही मुसलमान नाही,
सर्व जण मानव आहोत’,
असा संदेश देणारे गुरु नानक देव
यांच्या जयंतीच्या सर्व शीख बांधवाना हार्दिक शुभेच्छा!

शीख बांधवांचे आद्य गुरु, गुरु नानक
यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!

जगातील सर्व मानव समान आहेत
असा संदेश देणारे शीख धर्माचे संस्थापक
गुरु नानक यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !

शीख बांधवांचे गुरु,
गुरु नानक यांच्या जयंती निमित्त
सर्व शीख बांधवाना खूप खूप शुभेच्छा !

हे जग जिंकायचे असेल, तर स्वतःच्या कमतरतेवर,
दुर्गुणांवर मात करणे अत्यंत आवश्यक आहे.
असा ज्ञान देणारे शीख बांधवांचे आद्य गुरु,
गुरु नानक जयंती निमित्त शुभेच्छा !

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News