महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय पैलवान सिकंदर शेखला पंजाबमधल्या शस्त्रास्त्रं तस्करी प्रकरणात जामीन मंजूर झाला आहे. सिकंदर शेखच्या नावावर या आधी कोणताही गुन्हा नव्हता, तसेच तो देशाचा मोठा पैलवान असल्याची बाब लक्षात घेऊन त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. पंजाबमध्ये शस्त्रास्त्रांच्या तस्करी प्रकरणात सिकंदर शेखला अटक करण्यात आली होती.
सिकंदर शेखला 3 दिवसांत जामीन
सिकंदर निर्दोष, आई-वडिलांचा दावा
सिकंदर शेखच्या आई-वडिलांनी त्याच्या निर्दोषतेचा दावा केला आहे. त्यांना वाटतं की सिकंदरला या प्रकरणात फसवलं गेलंय आणि चौकशीनंतर सत्य बाहेर येईल. सिकंदरचे वडील, पैलवान रशीद शेख म्हणाले की, “माझ्या मुलाने अत्यंत कष्टाने नाव कमावले आहे, कोणी तरी फसवून त्याला या प्रकरणात गुतवलं आहे. असा दावे आई-वडिलांकडून करण्यात येत आहे, तरी या प्रकरणात पुढील तपासानंतरच सत्य समोर येणार आहे.

प्रकरणात सुप्रिया सुळेंचीही मध्यस्थी
सिंकदर शेखला अटक झाल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. सिकंदरच्याा कुटुंबीयांनी सगळे आरोप फेटाळले होते. सिंकदरच्या सुटकेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला. सिंकदर शेख याला न्याय मिळण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. त्यानंतर या घडामोडी घडताना दिसत आहेत. मात्र सिकंदर शेखवरील आरोपांचं काय होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.











