Rashi Bhavishya : 30 वर्षांनी बनला नवपंचम राजयोग! या राशीना मिळणार छप्परफाड पैसा

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य प्रत्येक महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवास करतो आणि सुमारे ३० दिवस एका राशीत राहतो. यावेळी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे आणि त्याच वेळी शुक्र व मंगळाच्या युतीत राहणार आहे

ग्रहांच्या हालचालीचे आपल्या जीवनात शुभ अशुभ परिणाम पाहायला मिळतात. ज्योतिषशास्त्रात (Rashi Bhavishya) याला खूप महत्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजा सूर्य प्रत्येक महिन्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवास करतो आणि सुमारे ३० दिवस एका राशीत राहतो. यावेळी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे आणि त्याच वेळी शुक्र व मंगळाच्या युतीत राहणार आहे. दरम्यान १७ नोव्हेंबर रोजी सूर्य आणि शनीच्या संयोगातून “नवपंचम राजयोग” तयार होणार आहे. या राज्य योगामुळे काही राशींना छप्परफाड पैसा मिळणार आहे.

कर्क राशी

कर्क राशीसाठी नवपंचम राजयोग अतिशय फायदेशीर ठरणार आहे. मीन राशीत वक्री शनी आणि वृश्चिक राशीत सूर्य असल्याने, कर्क राशीच्या (Rashi Bhavishya) लोकांच्या नशिबात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंतची रक्कडलेली कामे पूर्ण होतील. नोकरदार वर्गाला कामाच्या ठिकाणी बढती मिळेल आणि साहजिकच पगार वाढ होईल. व्यवसायिकांसाठी हा काळ आर्थिक स्थैर्याचा असेल. 17 नोव्हेंबर नंतर जुने मित्र भेटण्याची शक्यता असून बाहेर फिरण्याचा योग जुळून येईल.

वृश्चिक राशी (Rashi Bhavishya)

या राशीत सूर्य स्वतः प्रवेश करत असल्यामुळे हा काळ अत्यंत फलदायी असेल. आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या कष्टाची चीज पाहायला मिळेल. मेहनतीच्या मानाने लाभ जास्त होईल. व्यावसायिकांसाठी 17 नोव्हेंबर नंतर नवीन प्रोजेक्ट मिळू शकतो. नोकरीत पदोन्नती किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. उत्पन्नाचे नवीन नवीन सर्व निर्माण होते. ज्यांचं लग्न ठरलेलं नाही अशा लोकांसाठी 17 नोव्हेंबर नंतरचा काळ अतिशय अनुकूल असेल. आरोग्यही चांगले राहील.

मकर राशी

शनी आणि सूर्याचा नवपंचम राजयोग या राशीसाठीही शुभ ठरेल. या काळात सूर्य अकराव्या घरात आणि शनी दुसऱ्या घरात असेल, ज्यामुळे अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमची जी काही जुनी कामे रखडलेली होती ती 17 नोव्हेंबर नंतर पूर्णत्वास जातील. घरगुती वातावरण अत्यंत सकारात्मक राहील. जुने शत्रुत्व मिटेल. अनपेक्षित पणे नवीन नोकरी मिळू शकते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News