सध्याच्या या धावपळीच्या युगात अनेकदा घरांमध्ये वाद-विवाद पाहायला मिळतात पैशाची अडचण, स्वभावातील मतभेद, आणि छोट्या छोट्या गोष्टीवरून एकमेकांना टोचून बोलणे अशा या ना त्या कारणाने अनेकांच्या घरात तू मी तू मी होत असते. परंतु घरातील वादाला फक्त माणसाचा स्वभावच कारणीभूत नसतो तर वास्तू शास्त्रातील दोष ( Vastu Tips) हे सुद्धा यामागच कारण असू शकते. तुमच्याही घरात वादाची समस्या असेल तर हे नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामधील काही उपाय जाणून घेऊयात.
घराच्या भिंतीचा रंग
वास्तुशास्त्रानुसार तुम्ही ज्या घरात राहता, त्या घराच्या भिंतींचा रंग हा शांत असला पाहिजे, भिंतीचा रंग हा कधीही भडक नसावा. कारण भडक रंग म्हणजे नकरात्मकता आणि शांत सौम्य रंग म्हणजे सकारात्मकता होय. त्यामुळे या रंगाचा परिणाम सुद्धा घरातील लोकांवर पडतो.

झाडे (Vastu Tips)
वास्तुशास्त्रानुसार काही झाडे तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक ठेवू शकतात. साहजिकच यामुळे घरातील अनेक समस्या जसे की आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या दूर होण्याची शक्यता असते. यातील एक झाड म्हणजे तुळस … घरात तुळशीचे झाड हे असायलाच पाहिजे. लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांना तुळशीचं झाडं हे अत्यंत प्रिय असतं. जर तुम्ही तुमच्या घरात तुळशीचं झाडं लावलं तर सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, तुळशीच्या झाडासोबत घरात लकी बांबू किंवा मनी प्लांटचं रोपटं लावणे सुद्धा शुभ मानले जाते. Vastu Tips
साफ-सफाई करा
वास्तुशास्त्रानुसार घराची नेहमी साफसफाई करावी घर नेहमी नीटनेटके आणि स्वच्छ असावे. कारण जिथे स्वच्छता आहे तिथेच लक्ष्मी माता वास करते. लक्ष्मी मातेच्या आशीर्वादामुळे घरातील सर्व अडचणी वाद-विवाद दूर होतात आणि आर्थिक स्थैर्य लाभते.
घरात कधीही वादविवाद होत नाहीत.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











