दिवा विझल्यानंतर त्याची जी वात जी राहते त्याचे हिंदू धर्मशास्त्रात काही नियम सांगितले आहेत. घरात देवपूजा करताना किंवा दिवा लावताना वापरल्या जाणाऱ्या वाती अनेकजण सहजपणे कचऱ्यात फेकून देतात. मात्र, धार्मिक आणि आध्यात्मिक मान्यतेनुसार हे करणं शुभ नाही. त्या वातीचे काय करावे? या विषयी जाणून घेऊयात…
जळालेल्या वातीचे काय करावे?
जमिनीत पुरा
विझलेल्या वातीला कचऱ्यात टाकण्याऐवजी, जमिनीत पुरणे हा एक शुभ मानला जाणारा उपाय आहे. जळलेली वात कचऱ्यात न टाकता, शक्य असल्यास जमिनीत पुरावी. यामुळे सकारात्मक ऊर्जा घरातच राहते. वात कचऱ्यात टाकणे अशुभ मानले जाते, कारण यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा निघून जाते.

कपड्यात बांधून ठेवावी
तुम्ही वात एका स्वच्छ कपड्यात बांधून नदी किंवा इतर पवित्र ठिकाणी विसर्जन करू शकता. किंवा एका कपड्यात बांधून ठेवावी.
पाण्यात सोडणे
जळलेली वात वाहत्या पाण्यात सोडणे देखील एक योग्य मार्ग आहे. यामुळे ती वात प्रवाहाबरोबर वाहून जाते आणि तिच्यातील सकारात्मक ऊर्जा वातावरणात मिसळते.
पुन्हा वापरू नये
शिल्लक राहिलेली वात पुन्हा वापरु नये. दिवा स्वच्छ धुवून दुसरी वात लावावी. पुन्हा तीच वापरू नये. जळलेली वात पुन्हा वापरू नये.
पायाखाली येऊ देऊ नका
वात कधीही पायाखाली येणार नाही याची काळजी घ्या, कारण त्यात सकारात्मक ऊर्जा असते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











