देव दीपावली दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी करण्यात येते. दिवाळीनंतर हा दिवस देवांची दिवाळी म्हणून साजरी करण्यात येते.
पौराणिक कथा
पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर राक्षसाचा वध करून देवतांना त्यांच्या त्रासातून मुक्त केले होते. त्यामुळे देवतांनी आनंद व्यक्त करत ही दिवाळी साजरी केली. या दिवशी सर्व देव-देवता काशीच्या गंगा घाटावर येतात आणि दिवाळी साजरी करतात अशी श्रद्धा आहे.

देव दिवाळीला दीपदान का करतात?
धार्मिकशास्त्रानुसार देव दिवाळीच्या रात्री दीपदान केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. तसंच धन-धान्याची कोणतीही कमतरता राहत नाही. सर्व देवतांची कृपा कुटुंबावर सदैव राहते तसंच यमदीप लावल्याने अकाली मृत्यूची भीती दूर होते अशी मान्यता आहे.
दीपदानाचं महत्व
दीपदान हे अंधारावर प्रकाशाचा आणि ज्ञानाचा विजय दर्शवते. हा सोहळा जीवनातील अंधकार दूर करून समृद्धी आणण्यासाठी साजरा केला जातो. कार्तिक पौर्णिमेला दीपदान केल्याने आर्थिक लाभ होतो असे मानले जाते. या दिवशी दीपदान, स्नान आणि दानधर्माला विशेष महत्त्व दिले जाते. देव दिवाळीला विशिष्ट ठिकाणी दिवे लावल्यास अकाली मृत्यू टाळता येतो.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











