Laxmi Narayan Yog : लक्ष्मी-नारायण योगामुळे 3 राशीना सोन्याचे दिवस; बुध- शुक्राची युती फायद्याची ठरणार

पंचांगानुसार, २ नोव्हेंबर २०२५ रोजी शुक्र ग्रहाने तुळ राशीत प्रवेश केला होता. तो 26 नोव्हेंबर पर्यंत तुळ राशीतच असेल.  याचदरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी ७ वाजून ५८ मिनिटांनी बुध देखील तूळ राशीत प्रवेश करेल, त्यामुळे या काळात बुध-शुक्राची युती तयार होईल. या बुध आणि शुक्राच्या युतीमुळे “लक्ष्मी-नारायण योग” (Laxmi Narayan Yog) निर्माण होत आहे

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो.. राशी परिवर्तनाचा प्रभाव सर्वच लोकांच्या आयुष्यावर पडत असतो. पंचांगानुसार, २ नोव्हेंबर २०२५ रोजी शुक्र ग्रहाने तुळ राशीत प्रवेश केला होता. तो 26 नोव्हेंबर पर्यंत तुळ राशीतच असेल.  याचदरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी ७ वाजून ५८ मिनिटांनी बुध देखील तूळ राशीत प्रवेश करेल, त्यामुळे या काळात बुध-शुक्राची युती तयार होईल. या बुध आणि शुक्राच्या युतीमुळे “लक्ष्मी-नारायण योग” (Laxmi Narayan Yog) निर्माण होत आहे. या योगामुळे 3 राशीच्या लोकांना विशेष फायदा होणार आहे. त्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती नांदणार आहे.

1) मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी लक्ष्मी-नारायण योग अत्यंत अनुकूल असेल. खास करून नोकरदार वर्गाला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल आणि प्रमोशन मिळेल. साहजिकच तुमची पगारवाढ होईल..घरातील वातावरण हे सकारात्मक राहील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. वैवाहिक आयुष्यात सुद्धा गोडी गुलाबी राहील. साथीदाराशी काही वाद असतील तर ते सुद्धा मिटतील.. एखाद्याशी जुने शत्रुत्व असेल तर ते सुद्धा संपेल.

2) तूळ (Laxmi Narayan Yog)

लक्ष्मी नारायण योग तूळ राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. तुम्ही जिथे लाथ माराल तिथे पाणी काढाल. अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत निर्माण होतील. करिअर मध्ये सकारात्मक बदल पाहायला मिळेल. जिथे तुम्ही नोकरी करत आहात त्याठिकाणी चांगली बातमी मिळेल. जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील तसेच कोणाला उधार पैसे दिले असतील तर ते सुद्धा मिळतील. तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील.

3) कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी लक्ष्मी नारायण योग (Laxmi Narayan Yog) खूप अनुकूल असेल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. नशीबाची संपूर्ण साथ कुंभ राशीच्या लोकांना लाभेल. तुम्ही जर कुठे गुंतवणूक करू इच्छित असाल तर हा काळ अतिशय अनुकूल असेल. आर्थिक परिस्थिती नेहमी चांगलाच असेल आणि घरातील वातावरण सुद्धा आनंदाचे राहील.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News