मित्रानो, आपल्याला रात्री झोपल्यानंतर अनेकदा वेगवेगळी स्वप्ने पडतात (Dream Meaning). काही स्वप्न आनंदाची असतात तर काही स्वप्न भयावह असतात. तसेच अशी काही स्वप्न असतात जे तुमच्यासोबत भविष्यात ज्या -काही गोष्टी घडणार असतील त्याचे संकेत देतात. स्वप्नशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुम्हाला पडणाऱ्या अनेक स्वप्नांचे अर्थ सांगण्यात आले आहेत. आज आपण जाणून घेऊयात स्वप्नांत कोणत्या गोष्टी आल्यानंतर तुमचं नशीब फळफळू शकते.
1) चांदीच्या नाण्यांनी भरलेला कलश –
जर तुमच्या स्वप्नामध्ये चांदीच्या नाण्यांनी भरलेला कलश आला तर असं सप्न खूपच शुभ मानलं जातं, याचा अर्थ तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळणार आहे. तसेच तुम्हाला आयुष्यात प्रचंड पैसा मिळेल. अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता असते. एकूणच काय तर तुमचं भाग्य उजळेल.

2) फुलांनी बहरलेलं गार्डन – (Dream Meaning)
जर तुमच्या स्वप्नामध्ये फुलांनी बहरलेली एखादी सुंदर बाग आली तर या स्वप्नाचा अर्थ असा होतो, की तुम्हाला आता तुमच्या आयुष्यात लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. तुमच्या आयुष्याला नवी दिशा मिळेल.
3) स्वप्नात देव दिसणे
स्वप्नात देवाचे दर्शन होणे हे जवळपास अशक्य असतें कारण कोणाच्याही स्वप्नात देव येत नाही. जो खरा भक्त असतो त्यालाच देव स्वप्नात दिसतो. स्वप्न शास्त्रानुसार जर तुमच्या स्वप्नात देव आला तर याचा अर्थ असा होतो, की तुमच्यावर देवांची कृपा आणि आशीर्वाद आहे. तुमच्या आयुष्यात काही संकटे असतील तर ती सुद्धा दूर जातील. (Dream Meaning)
4) आरशामध्ये स्वत:ला पहाणं –
जर स्वप्नामध्ये तुम्ही स्वत:ला आरशात पहात असाल तर हे अत्यंत शुभ स्वप्न मानलं जातं, याचा अर्थ लवकरच तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडणार असून, हा बदल सकारात्मक असणार आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











