ईडीचा शिखर धवन, सुरेश रैनाला धक्का; कोट्यवधींची संपत्ती जप्त, प्रकरण नेमकं काय?

वनएक्सबेट मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या ११.१४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर तात्पुरती जप्ती आणली आहे.

ईडीने बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग साइटशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या एकूण 11.14 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे. गुरुवारी जारी करण्यात आलेल्या प्राथमिक आदेशानुसार, प्रतिबंधक मनी लॉन्ड्रिंग कायदा अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

शिखर धवन, सुरेश रैनाला ईडीचा दणका

भारताचे माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांचा मोठा धक्का बसला आहे. कारण अंमलबजावणी संचालनालयाने या दोघांना दोषी ठरवले असून त्यांच्यावर कडक कारवाई केली आहे. या दोघांच्या करोडो रुपयांच्या मालमत्तेवर आता जप्ती आणण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्याविरुद्ध मोठी कारवाई केली आहे.

वनएक्सबेट मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या ११.१४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर तात्पुरती जप्ती आणली आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेत सुरेश रैनाच्या नावावर ६.६४ कोटी रुपये आणि शिखर धवनच्या नावावर ४.५ कोटी रुपये किमतीचे म्युच्युअल फंड समाविष्ट आहेत.

नेमकं प्रकरण काय, कारवाई का केली?

ईडीची ही चौकशी विविध राज्यांच्या पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरवर आधारित आहे. हे प्रकरण बेकायदेशीर ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्म  1xBet शी संबंधित आहे. ईडीच्या तपासात असे आढळले आहे की, दोन्ही माजी क्रिकेटपटूंनी जाणूनबुजून परदेशी कंपन्यांशी करार करून 1xBet आणि त्याच्याशी संबंधित अन्य साइट्सच्या जाहिराती केल्या होत्या. ईडीच्या मते, रैना आणि धवन यांनी परदेशी कंपन्यांसोबत मिळून या प्लॅटफॉर्म्सच्या जाहिराती केल्या आणि त्याबदल्यात त्यांना परदेशातून पैसे मिळाले. हे पैसे बेकायदेशीर सट्टेबाजीमधून मिळालेले होते, आणि त्यांचा खरा स्रोत लपवण्यासाठी गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार करण्यात आले.


About Author

Rohit Shinde

Other Latest News