शाहरुख खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दमदार भूमिकेत झळकणार आहे. त्यांच्या आगामी चित्रपट ‘किंग’चा टायटल अॅनाउन्समेंट ( Shahrukh Khan Movie King) व्हिडिओ त्यांच्या 60व्या वाढदिवसादिवशी प्रदर्शित झाला आणि त्यानंतरपासूनच या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार, ‘किंग’ ही भारतातील आतापर्यंतची सर्वात महागडी अॅक्शन फिल्म ठरणार आहे. या चित्रपटाने शाहरुखच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनाही बजेटच्या बाबतीत मागे टाकलं आहे. बॉलिवूड हंगामा च्या अहवालानुसार, ‘किंग’चं एकूण बजेट तब्बल ३५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. यात प्रिंट आणि प्रमोशनचा खर्च समाविष्ट नाही. तुलनेत ‘पठाण’चा खर्च सुमारे २५० कोटी होता. त्यामुळे ‘किंग’ शाहरुखच्या कारकिर्दीतील सर्वात महागडा प्रोजेक्ट ठरणार आहे.
सुरुवातीला ‘किंग’ ( Shahrukh Khan Movie King) हा एक मीडियम बजेट थ्रिलर असणार होता, ज्याचे दिग्दर्शन सुजॉय घोष करत होते. मात्र, जेव्हा ‘पठाण’ आणि ‘वॉर’सारख्या सुपरहिट अॅक्शन चित्रपटांचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद या प्रोजेक्टला जोडले गेले, तेव्हा चित्रपटाचं स्केलच बदललं. सिद्धार्थ यांनी या चित्रपटाला एक मेगा अॅक्शन फ्रँचायझीमध्ये रूपांतरित केलं आणि इंटरनॅशनल स्टंट डिझायनर्स व टेक्निकल टीमला जोडून ग्लोबल लेव्हलचा अनुभव देण्याचं ठरवलं.

6 हाई-ऑक्टेन अॅक्शन सीन्स
‘किंग’मध्ये तब्बल सहा हाई-ऑक्टेन अॅक्शन सीन्स असतील. त्यापैकी तीन रिअल लोकेशन्सवर शूट केले जातील, तर उर्वरित तीन भव्य सेट्सवर चित्रित होतील. शाहरुख खान यांनी सिद्धार्थ आनंद यांना पूर्ण क्रिएटिव्ह स्वातंत्र्य दिलं आहे, जेणेकरून हा प्रोजेक्ट इंटरनॅशनल स्टँडर्डवर तयार करता येईल.
कधी होणार प्रदर्शित?? Shahrukh Khan Movie King
‘किंग’ ही फक्त एक भारतीय फिल्म नसेल, तर एक ग्लोबल सिनेमॅटिक एक्स्पिरियन्स देणारी भव्य कलाकृती ठरणार आहे. सिद्धार्थ आनंद यांचा उद्देश आहे की हॉलीवूड दर्जाची फिल्म भारतीय बजेटमध्ये तयार करून दाखवावी. हा चित्रपट पुढील वर्षी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, शाहरुखचे चाहते आतापासूनच या मेगा प्रोजेक्टच्या प्रतीक्षेत आहेत.











