बॉलिवूडमध्ये मातृत्वाचा महोत्सव ! 4 अभिनेत्रींनी दिला बाळाला जन्म

2025 हे वर्ष या चारही अभिनेत्रींसाठी केवळ करिअर नव्हे, तर आयुष्यातील सर्वात खास वळण घेऊन आलं आहे. चमकदार पडद्याच्या जगातून थोडं बाजूला होत त्यांनी आता जीवनातील सर्वात सुंदर भूमिकेत  ‘आई’ या रूपात पाऊल ठेवलं आहे

बॉलिवूडमध्ये सध्या आनंद, भावूकता आणि नव्या सुरुवातीचं वातावरण आहे. या वर्षी रुपेरी पडद्यावर चमकणाऱ्या चार नामांकित अभिनेत्रींच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे तो म्हणजे मातृत्वाचा मातृत्वाचा. त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांच्या आगमनाने संपूर्ण फिल्म इंडस्ट्री आनंदाच्या भरात न्हाऊन निघाली आहे.

कतरिना आणि विकी

सर्वात आधी गोड बातमी घेऊन आली ती अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल यांच्या घरून. काही महिन्यांपासून त्यांच्या प्रेग्नन्सीची चर्चा सुरु होती, आणि शेवटी 2025 च्या सुरुवातीला त्यांनी एका गोंडस मुलाचं स्वागत केलं. कतरिना आणि विक्कीने सोशल मीडियावर हा आनंदाचा क्षण शेअर करताना आपल्या चाहत्यांचे आभार मानले. त्यांच्या या पोस्टनंतर इंडस्ट्रीतील मित्रमंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आणि सोशल मीडियावर #BabyKaushal ट्रेंड झाला.

परिणीती चोप्रा

यानंतर, ऑक्टोबर महिन्यात अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि तिचा पती, खासदार राघव चड्ढा यांच्या आयुष्यातही छोट्या पाहुण्याचं आगमन झालं. परिणीतीने इन्स्टाग्रामवर लिहिलं, “शेवटी तो आला! आमचं आयुष्य आता अधिक सुंदर झालं आहे.” त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा पाऊस पाडला.

इलियाना डिक्रूज

बॉलिवूडची मोहक आणि शांत स्वभावाची अभिनेत्री इलियाना डिक्रूज हिने देखील या वर्षी पुन्हा एकदा मातृत्वाचा अनुभव घेतला आहे. तिने पती मायकेल डोलनसोबत आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्माची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. या जोडप्याने आपल्या मुलाचं नाव ‘कीनू राफे डोलन’ ठेवलं आहे. विशेष म्हणजे इलियाना आणि मायकेल यांनी 2023 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचं ‘कोआ फिनिक्स डोलन’ असं नामकरण केलं होतं.

सना खान

या यादीतील चौथं नाव आहे अभिनेत्री आणि माजी बिग बॉस स्पर्धक सना खानचं. 5 जानेवारी रोजी सना आणि तिचा पती मुफ्ती अनस सईद यांच्या घरी दुसऱ्या मुलाचा जन्म झाला. त्यांनी आपल्या मुलाचं नाव ‘सैयद हसन जमील’ ठेवलं आहे. सना खानने 2020 मध्ये बॉलिवूडला निरोप देत धार्मिक जीवन स्वीकारलं आणि अनस सईदशी विवाह केला होता. तिचा पहिला मुलगा ‘सईद तारिक जमील’ 2023 मध्ये जन्मला होता.

2025 हे वर्ष या चारही अभिनेत्रींसाठी केवळ करिअर नव्हे, तर आयुष्यातील सर्वात खास वळण घेऊन आलं आहे. चमकदार पडद्याच्या जगातून थोडं बाजूला होत त्यांनी आता जीवनातील सर्वात सुंदर भूमिकेत  ‘आई’ या रूपात पाऊल ठेवलं आहे. बॉलिवूडमध्ये यंदा खऱ्या अर्थाने मातृत्वाचा महोत्सव साजरा होत आहे, आणि या चिमुकल्या पाहुण्यांनी संपूर्ण इंडस्ट्रीला नव्या आनंदाने उजळून टाकलं आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News