Garud Puran : मृत व्यक्तीच्या या वस्तू कधीही वापरू नका; पहा गरुड पुराणात काय सांगितलं

गरुड पुराणात स्पष्टपणे सांगितले आहे की मृत व्यक्तीच्या वस्तू वापरल्याने जीवनात नकारात्मक प्रभाव वाढतो. असे केल्याने पितृदोषाचा धोका वाढतो. पितृदोषामुळे घरातील सुख संपून जाते आणि श्रीमंती व्यक्तीही भिकारी बनू शकतो

गरुड पुराण (Garud Puran) हा एक वैष्णव धर्मग्रंथ आहे. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी गरुडाला दिलेल्या उत्तरांचा समावेश आहे. गरुड पुराणात जीवन आणि मृत्यूशी संबंधित अनेक रहस्ये उलगडली आहेत. यामध्ये मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते, नरक-स्वर्गाचे वर्णन, आणि पाप-पुण्याच्या कर्मांनुसार मिळणाऱ्या फळांची माहिती आहे. मेलेल्या माणसाच्या कोणत्या वस्तू आपण वापरू नयेत याबद्दलची माहितीही गरुड पुराणात सांगण्यात आलेली आहे. गरुड पुराणात स्पष्टपणे सांगितले आहे की मृत व्यक्तीच्या वस्तू वापरल्याने जीवनात नकारात्मक प्रभाव वाढतो. असे केल्याने पितृदोषाचा धोका वाढतो. पितृदोषामुळे घरातील सुख संपून जाते आणि श्रीमंती व्यक्तीही भिकारी बनू शकतो. त्यामुळे मृत व्यक्तीच्या कोणत्या वस्तू वापरू नयेत ते जाणून घेऊया.

मृत व्यक्तीचे कपडे

मृत व्यक्तीचे कपडे घालणे अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की मृत व्यक्तीची ऊर्जा कपड्यांमध्ये राहते, जी इतरांनी वापरल्यास त्याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. हे कपडे वापरल्याने मानसिक ताण किंवा आजार होऊ शकतात.

घड्याळ (Garud Puran)

मृत व्यक्तीचे घड्याळ घालणे देखील अयोग्य मानले जाते. मेलेल्या माणसाने वापरलेले घड्याळ जर आपण आपल्या हातात घातले तर जीवनात अडथळे येऊ शकतात आणि दुर्दैवाच्या गोष्टीही घडू शकतात.

बूट

बूट हे पृथ्वी तत्वाशी सर्वाधिक संबंधित असतात, म्हणून असे म्हटले जाते की मृत व्यक्तीचे बूट कधीही घालू नये. असे केल्याने घरात दुःख, गरिबी आणि नकारात्मकता येते. (Garud Puran)

भांडी

मृत व्यक्तीने वापरलेली भांडी सुद्धा घरात ठेवू नयेत. असे मानले जाते की ही भांडी मृत व्यक्तीच्या अन्नाची सूक्ष्म ऊर्जा शोषून घेतात, ज्यामुळे हळूहळू दुर्दैव आणि अशांतता निर्माण होऊ शकते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News