पुणेकरांसाठी आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून थेट अबुधाबी पर्यंत विमान सेवा (Pune To Abu Dhabi Flight)लवकरच सुरू होणार आहे. देशातील आघाडीची विमान कंपनी एअर इंडियाने याबाबत अधिकृत घोषणा जाहीर केली. एअर इंडियाच्या या निर्णयानंतरपुणे आणि युएई (UAE) दरम्यान थेट हवाई कनेक्टिव्हिटीची प्रवाशांची सुविधा निर्माण होणार आहे.
कधीपासून सुरू होणार विमानसेवा Pune To Abu Dhabi Flight
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा मागील काही वर्षात मोठा विस्तार झाला आहे. या विमानतळावरून अनेक देशांसाठी विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. पुण्यातील अनेक जणांचे नातेवाईक हे आखाती देशात आणि खास करून दुबईमध्ये वास्तव्यास आहेत. अशावेळी पुण्यापासून थेट UAE पर्यंत विमान सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. सध्या पुणे विमानतळावरून अनेक आशियाई शहरांसाठी थेट विमान सेवा आहे. मात्र, युएईसाठी, नॉन-स्टॉप सेवा नसल्याने नागरिकांनी ही सेवा सुरु करण्याची मागणी केली होती. अखेर आता 2 डिसेंबर पासून पुण्याहून थेट अबुधाबी पर्यंत विमानसेवा (Pune To Abu Dhabi Flight) सुरू होणार आहे . त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होईल.

आठवड्यातून 3 दिवस सेवा
या नवीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांचे वेळापत्रक व्यावसायिक आणि खासगी प्रवाशांसाठी अत्यंत सोयीचे आहे. पुणे ते अबुधाबी विमानसेवा आठवड्यातून 3 दिवस सुरू राहील.मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या 3 दिवशी पुण्याहून अबुधाबीला विमानाचे उड्डाण होईल. पुण्याहून रात्री 8.50 वाजता विमानाचे टेक-ऑफ होईल तर त्याच रात्री 10.45 वाजता हे विमान अबुधाबीत पोहचेल. यानंतर परतीचे उड्डाण: रात्री 11.45 वाजता अबू धाबीहून होईल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4.15 वाजता विमान पुण्यात येईल.











