Delhi Blast: दिल्लीतील स्फोटात 8 जणांचा मृत्यू, 24 जण गंभीर, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. यामध्ये 24 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट झाला असून त्यामुळे दिल्ली हादरल्याचं दिसून आलं. त्यामध्ये आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू; 24 गंभीर जखमी

राजधानी नवी दिल्लीतील प्रसिद्ध लाल किल्ला येथील मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक 1 जवळ उभ्या असलेल्या एका गाडीत मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. हाती आलेल्या रिपोर्टनुसार किमान 3 गाड्यांना आग लागली होती. या स्फोटात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. यामध्ये 24 जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.

दहशतवादी हल्ला; पोलिसांना संशय

देशाची राजधानी दिल्लीमध्ये शक्तिशाली स्फोट झाला आहे. लाल किल्ला परिसरात एका कारमध्ये हा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर २४ जण जखमी झाले आहे. हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याचं आता समोर आलं आहे. या प्रकरणात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. स्फोटामध्ये IED चा वापर करण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. IED स्फोट हा दहशतवादी किंवा माओवाद्यांकडून घडवण्यात आल्याच्या आतापर्यंतच्या घटना आहे.

दिल्लीतील घटनेची पंतप्रधानांकडून दखल

दिल्ली स्फोटाचे वृत्त आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ गृहमंत्री अमित शाह यांना फोन करून सुरक्षेची माहिती घेतली. नरेंद्र मोदी यांनी सुरक्षेच्या दृष्टीने गृह मंत्रालयाला अधिक सूचना केल्या. त्यावर गृहमंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे शाह यांनी मोदींना सांगितल्याचे कळते.


About Author

Rohit Shinde

Other Latest News